---Advertisement---

‘या’ भारतीय खेळाडूसाठी लकी ठरतयं 2022! टी20 पाठोपाठ वनडेत पदार्पण, वर्ल्डकपच्याही संघात

On: गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022 5:27 PM
Dhawan & Kuldeep yadav & Gill & Bishnoi & Ishan & Sanju Samson
---Advertisement---

भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvSA) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम, लखनऊ येथे खेळला जात आहे. पावसामुळे उशिरा सुरू झालेला हा सामना प्रत्येकी 40-40 षटकांचा खेळला जाणार आहे. या मालिकेत भारत शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली खेळत असून पहिल्याच सामन्यात दोन खेळाडूंनी भारताच्या वनडे संघात पदार्पण केले आहे. त्यातील एकासाठी तर 2022 हे वर्ष लकी ठरताना दिसत आहे. याचे कारण आपण जाणून घेऊया.

या सामन्यातील अंतिम अकरामध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांना संधी मिळाली आहे. या दोघांचेही भारताच्या वनडेमध्ये पदार्पण असून त्यातील रवी बिश्नोई या फिरकीपटूने याच वर्षी भारताकडून टी20मध्ये पदार्पण केले आहे. त्याचबरोबर त्याला ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या राखीव खेळाडूमध्येही जागा दिली आहे.

बिश्नोई हा भारताचा 246वा तर रुतुराज हा 245वा वनडे खेळाडू ठरला आहे.

जोधपूरच्या बिश्नोईने पदार्पणाच्याच टी20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. फेब्रुवारीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 4 षटके टाकताना 17 धावा देत रोस्टन चेज (4) आणि रोवमन पॉवेल (2) यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो सामनावीराचा मानकरीही ठरला. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला.

बिश्नोईने स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण 2019च्या सईद मुश्ताक अली ट्रॉफी या स्पर्धेतून केले. तसेच तो 2020मध्ये आयसीसीच्या 19 वर्षाखालील संघातही खेळला आहे. तेव्हा त्याने स्पर्धेत सर्वाधिक अशा 17 विकेट्स घेतल्या होत्या. नंतर त्याला आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने 2 कोटी रुपयांना संघात घेतले. तो 2022च्या हंगामासाठी लखनऊ सुपर जायंट्स संघात सामील झाला.

बिश्नोईने भारताकडून 10 टी20 सामने खेळताना 16 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवली आहे. त्याने 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 37 आयपीएलच्या सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत. नुकतेच त्याने झालेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध दोन चेंडूत दोन चौकार ठोकले होते. हा क्षण विसरून चालणार नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर प्रतिक्षा संपली! तब्बल 15 महिन्यांनी झाले ऋतुराजचे वनडे पदार्पण
कहर झाला! ‘या’ देशाच्या खेळाडूने ठोकली टी20मध्ये डबल सेंच्युरी, 22 षटकारांसह धावांचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---