---Advertisement---

INDvSA: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहितच! धोनीला टाकले मागे, वाचा सविस्तर

On: गुरूवार, सप्टेंबर 29, 2022 9:57 AM
Rohit Sharma
---Advertisement---

भारताने दक्षिण आफ्रिकेचा (INDvSA)पहिल्या टी20मध्ये 8 विकेट्सने पराभव केला आहे. बुधवारी (28 सप्टेंबर) तिरूअंनतपुरम येथे हा सामना खेळला गेला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना भारताने जिंकला असल्याने भारताने अनेक विक्रम रचले आहेत. टी20 मालिकेतील या विजयामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने माजी कर्णधार एमएस धोनी याचा मोठा विक्रम मोडला आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारताचा टी20 प्रकारातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरत आहे. त्याने मागील अनेक मालिकांमध्ये भारताला विजय मिळून दिले आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय त्याच्यासाठी खास ठरला आहे. एकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणारा भारतीय कर्णधार हा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करताना त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला मागे टाकले आहे. धोनी आता एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणारा भारतीय कर्णधार या यादीत दुसऱ्या स्थानावर सरकला आहे.

भारतीय कर्णधार म्हणून रोहितचा हा 2022मधील 16वा आंतरराष्ट्रीय टी20 विजय ठरला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने 2016मध्ये भारतीय कर्णधार म्हणून 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकले होते. त्यावर्षी टी20 विश्वचषक खेळला गेला. तसेच यावर्षीही टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे, मात्र यावर्षी आशिया चषकामध्ये भारताने टी20 सामने खेळले आहेत. ज्यातील चार सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व रोहितने केले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आर अश्विन, दीपक चाहर आणि अक्षर पटेल यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 106 धावसंख्याच उभारू शकला. यावेळी अश्विनने विकेट जरी घेतली नसली तरी त्याने 4 षटके टाकताना 8 धावाच दिल्या. अर्शदीप सिंग याने विरोधी संघाच्या महत्वाच्या फलंदाजांना बाद करत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्याने 3 विकेट्स घेतल्या, तर हर्षल पटेलने दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात भारताने 16.4 षटकात लक्ष्य पार केले. यावेळी केएल राहुल आणि सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादव यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केल्या आहेत. या मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्याचा प्रकाश लख्ख पडतोय! एकाच खेळीत रचले अनेक विश्वविक्रम
सिंग इज किंग! 25 दिवसांपूर्वी टीकेचा धनी ठरलेला अर्शदीप आज ठरला हिरो
चहर-अर्शमूळे दक्षिण आफ्रिका फर्शवर! सर्व प्रकारच्या टी20 मधील सर्वात लाजिरवाणी कामगिरी केली नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---