भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मंगळवारी (१४ जून) तिसरा टी२० सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ४८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच यजमान संघ पाच सामन्याच्या टी२० मालिकेत २-० असे टिकून आहेत. भारताचा कर्णधार रिषभ पंत याने या सामन्यातील विजयाचे शिल्पकार कोण आहेत हे बक्षिस वितरणावेळी सांगितले आहे.
“फलंदाजी करताना आम्ही १५ धावा मागे होतो. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत विजयामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. मधल्या काही षटकांमध्ये दबाव जाणवत होता, अशावेळी फिरकीपटूंनी दबावाखाली खेळत सामना आमच्या बाजूने केला,” असे पंत म्हणाला आहे.
या सामन्यात युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) तीन आणि हर्षल पटेलने चार विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने कटक सामन्यातील फॉर्म कायम राखत फलंदाजांना अधिक धावा करण्याची संधीच दिली नाही. त्याने ४ षटके टाकताना २१ धावा देत १ विकेट घेतली आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याने एन्रीच नोर्कियाला धावबाद केले आहे.
सलग तीन सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याने नाणेफेक जिंकला. त्याने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. डॉ. व्हायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर चमकले आहेत. दोघांनीही अर्धशतके करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. ऋतुराज गायकवाडने ५७ आणि इशान किशनने ५४ धावा केल्या आहेत.
सामन्यानंतर पंतने भारताच्या सलामीवीरांचे कौतुक केले आहे. मात्र मध्यम क्रमवारीतील फलंदाज लवकर बाद झाले यावर निराशा व्यक्त केली आहे. “सुरूवातीला फलंदाज जलद धावा करत होते. ते बाद झाल्यावर खेळ संथ पडला होता ही चांगली बाब नाही. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे,” असे पंतने पुढे म्हटले आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद २१ चेंडूत ३१ धावा केल्या आहेत. त्याने भारताने २० षटकात ५ विकेट्स गमावात १७९ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टीकूच दिले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी टीम इंडियाकडून खेळण्याच्या लायक नाही’, राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाने स्वत:च केले मान्य
रणजी ट्रॉफीसाठी खेळाडूंचं सिलेक्शन होतं तरी कसं, काय खटाटोप करावा लागतो? जाणून घ्या एका क्लिकवर