भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील टी२० मालिकेच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. पाच सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, तर यजमान संघ २-०ने मागे आहे. यातील तिसरा सामाना मंगळवारी (१४ जून) विशाखापट्टनम येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत टिकून राहण्यासाठी तिसऱ्या सामन्यात भारताला जिंकणे अतिमहत्वाचे आहे.
डॉ व्हायएस राजशेखर रेड्डी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला सांयकाळी ७ वाजता सुरूवात होणार आहे. भारताची या सामन्यात ‘करो वा मरो’ अशी स्थिती असणार आहे. सुरूवातीचे दोन सामने पाहिले तर पाहुणा संघ गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात पुढे दिसला आहे. काही भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यापैकी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सलग दोन सामन्यात धावा काढण्यात आणि फिरकीपटू विकेट्स घेण्यात अपयशी ठरल्याने भारत तिसऱ्या सामन्यात काही बदल करण्याची शक्यता आहे. अंतिम अकरामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते, हे पाहुया-
१. ऋतुराज गायकवाड ऐवजी वेंकटेश अय्यर येऊ शकतो सलामीला
केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाल्याने ऋतुराजला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. मात्र मागील दोन सामन्यात त्याने लवकरच आपली विकेट गमावली आहे. वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना तो अडखळला आहे. त्याने पहिल्या सामन्यात २३ आणि दुसऱ्या सामन्यात एकच धाव केली आहे.
ऋतुराजच्या या निराशाजनक कामगिरीमुळे वेंकटेश सलामीला येण्याची शक्यता आहे. त्याने आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना सलामीला फलंदाजी केली आहे. त्याचबरोबरच प्रथम श्रेणीच्या सामन्यातही वरच्या दोन क्रमांकावर फलंदाजी करण्याचा त्याला अनुभव आहे. त्याने आयपीएल २०२२च्या काही शेवटच्या साखळी सामन्यात फलंदाजी करत धावा जोडल्या आहेत. यावरून सलामीसाठी वेंकटेश हा एक पर्याय उपलब्ध आहे.
२. आवेश खानच्या जागी अर्शदीप सिंग
भारतीय संघाने मागील दोन सामन्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनाच खेळवले आहे. यामध्ये आवेश खान (Avesh Khan) याचा पण समावेश आहे. त्याला या दोन्ही सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. पहिल्या सामन्यात ४ षटके टाकत एकही विकेट न घेता ३५ धावा दिल्या होत्या. दुसऱ्या समान्यात तीन षटकात १७ धावा दिल्या होत्या. अर्शदिपकडे मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजांना त्रास देण्याची क्षमता आहे. या मालिकेत भारताच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकामध्ये चांगलाच मार खाल्ला आहे. अर्शदिपला तिसऱ्या सामन्यात संघात घेतले तर गोलंदाजी अधिक आक्रमक बनेल.
३. अक्षर पटेलच्या जागी उमरान मलिक
तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ (Team India) अक्षर पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) अंतिम अकरामध्ये खेळवू शकतो. अक्षरने या मालिकेत त्याची अष्टपैलू खेळी दाखवली नाही. त्याने दुसऱ्या सामन्यात एक षटकात १९ धावा दिल्या होत्या. पहिल्या सामन्यात त्याने १०च्या इकोनॉमी रेटने ४० धावा दिल्या होत्या. उमरानला संघात घेतले तर त्याच्या वेगाचा संघाला फायदा होऊ शकतो.
भारत मालिकेत टिकण्यासाठी आणि दक्षिण आफ्रिका मालिका जिंकण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्यात आतुर आहेत.
भारतीय संघ: रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
दक्षिण अफ्रीकी संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिजा हेंड्रिक्स, हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रीक नॉर्किया, वायने पर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: विशाखापट्टनममध्ये पोहोचली ‘टीम इंडिया’, खेळाडूंचे झाले जंगी स्वागत
‘कर्णधार’ पंत ऑन द फिल्ड निर्णय घेण्यात पडतोय कमी, दुसऱ्या टी२०तील ‘त्या’ चुकीमुळे नेहरा नाराज
‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा