INDvsSA DRS Controversy: 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात जोहान्सबर्ग येथे गुरुवारी (दि. 14 डिसेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारताने 106 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका 1-1ने बरोबरीत सोडवली. मात्र, सामन्यादरम्यान घडलेल्या घटनेने मोठा वाद झाला. आता त्याविषयीच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. चला तर, त्याविषयी जाणून घेऊयात…
या सामन्यात नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करताना भारतीय (Team India) संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 201 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाची स्थिती खूपच खराब झाली होती. 8 षटकांनंतर त्यांची धावसंख्या 4 बाद 51 धावा होती. जेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वाईटरीत्या दुखापतग्रस्त होऊन तंबूत परतला, तेव्हा त्याच्या जागी उपकर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने नेतृत्व केले. त्यानंतर 9व्या षटकात जेव्हा जडेजा स्वत: गोलंदाजी करत होता, तेव्हा पंचांनी त्याला डीआरएस मागूनही दिला नाही. यावेळी डेविड मिलर (David Miller) स्पष्टपणे बाद असल्याचे वाटत होता.
का नाही मिळाला डीआरएस?
क्रिकेटच्या जगातील ही पहिली घटना नाहीये. नेहमीच तांत्रिक समस्येमुळे डीआरएस उपलब्ध नसतो. त्यामुळेच तिसऱ्या टी20 सामन्यातील 9व्या षटकातही हेच पाहायला मिळाले. जडेजा गोलंदाजी करत होता आणि चौथ्या चेंडूवर मिलरला चकवत चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे यष्टीरक्षक जितेश शर्मा याच्या हातात गेला. यावेळी भारतीय संघाला खात्री होती की, चेंडूला बॅटची कड लागली आहे. मात्र, मैदानी पंचांंनी त्याला नाबाद घोषित केले.
यानंतर तांत्रिक कारणामुळे डीआरएस उपलब्ध नव्हता. त्यामुळे कर्णधार जडेजाने पंचांना विचारले, तेव्हा त्यांनी डीआरएससाठी नकार दिला. तसे पाहिले तर, अशा स्थितीत पंच आधीच कर्णधाराला सांगतात, पण कदाचित इथे पंचांनी जडेजाला याविषयी माहिती दिली नव्हती. त्यामुळे जडेजा नाराज दिसला. तसेच, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हादेखील सीमारेषेवर चौथ्या पंचांसोबत बोलताना दिसला. त्यामुळेच याची सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेवर निशाणा साधला आहे. तसेच, यावर अप्रामाणिकपणाचाही सूर उठला आहे.
There was an edge from David Miller's bat, but DRS is currently unavailable so it was not out. pic.twitter.com/XVQkkyqvin
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 14, 2023
Pathetic management from @ProteasMenCSA . In 8th over DRS not functionable . In 9th over DRS working. WOW#INDvSA#DRS #SuryakumarYadav pic.twitter.com/8bYnQusFCv
— Shivam Sopori🇮🇳 (@shivamsopori) December 14, 2023
Ravindra Jadeja asked for DRS but umpire said DRS not available. Rahul Dravid was not happy with decision. But at last india won the match #INDvSA pic.twitter.com/N62k57XkKF
— Republic of Games (@kohlilfc) December 14, 2023
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालाय वाद
दक्षिण आफ्रिकेत यापूर्वी मागील मालिकेतही (2021-22) डीआरएसवरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी विराट कोहली, केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विन कसोटी मालिकेदरम्यान खूपच नाराज दिसले होते. त्यावेळी कर्णधार विराट स्टम्प माईकमध्ये तेथील ब्रॉडकास्टरला झापताना दिसला होता. तसेच, अश्विन आणि राहुलचीही रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. (ind vs sa 3rd t20 drs controversy review unavailable technical fault umpire denies ravindra jadeja read here)
हेही वाचा-
Rahul Dravid Angry: जयसवालच्या चुकीमुळे शुबमन गिल Out!, संतापलेल्या द्रविडची रिऍक्शन तुफान व्हायरल, Video
बीसीसीआयचा मोठा निर्णय! कुठलाच भारतीय खेळाडू घालू शकणार नाही धोनीचा जर्सी नंबर 7, ‘हे’ आहे कारण