Shubman Gill’s Wicket: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात गुरुवारी (दि. 13 डिसेंबर) जोहान्सबर्ग येथे तिसरा आणि अखेरचा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 106 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. असे असले, तरीही या सामन्यादरम्यान भारताचा सलामीवीर शुबमन गिल ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यालाही राग अनावर झाला. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
झालं असं की, या सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात करताना शुबमन गिल (Shubman Gill) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) मैदानात उतरले. गिलने 6 चेंडूत 8 धावा केल्या. तसेच, तो केशव महाराज टाकत असलेल्या तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पायचीत बाद झाला. गिल चांगल्या लयीत दिसत होता आणि मोठी खेळी करेल, असे वाटत होते. मात्र, तो लवकर बाद झाला.
खरं तर, गिल ज्याप्रकारे बाद झाला, तो नाबादच होता. शुबमन गिल एलबीडब्ल्यू (Shubman Gill LBW) पद्धतीने बाद झाला आणि डीआरएस न घेताच तंबूत परतला. यावेळी दुसऱ्या बाजूला असलेल्या यशस्वी जयसवाल याने त्याला रिव्ह्यू न घेण्याचा सल्ला दिला आणि तो तंबूत परतला. नंतर रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की, गिल नाबाद होता. कारण, चेंडू स्टम्पला लागत नव्हता.
नंतर रिप्ले जेव्हा मोठ्या स्क्रीनवर दाखवला गेला, तेव्हा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या चेहऱ्यावरील राग स्पष्टपणे दिसला. खरं तर, कोणताही फलंदाज फलंदाजी करत असतो, तेव्हा तो ठरवतो की, डीआरएस घ्यायचा की नाही. त्यासाठी तो दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या सहकाऱ्याचा सल्लाही घेतो. गिलनेही असेच काही केले.
— Cricket Videos (@cricketvid123) December 14, 2023
नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या फलंदाजाला चेंडू किती वळला, किती पुढे पडला, हे सर्व दिसते. मात्र, यशस्वीकडून इथे चूक झाली आणि अशाप्रकारे गिल स्वस्तात बाद झाला. यशस्वीने या सामन्यात 41 चेंडूत 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताने 20 षटकात 201 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने 56 चेंडूत 100 धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला 100 धावाही करता आल्या नाहीत. त्यांचा डाव 95 धावांवरच संपुष्टात आला. अशाप्रकारे भारताने हा सामना 106 धावांनी खिशात घातला. या सामन्यात भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादव चमकला. त्याने 2.5 षटकात 17 धावा खर्चत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. (ind vs sa 3rd t20i opener shubman gill out due to yashasvi jaiswal mistake rahul dravid got angry see video)
हेही वाचा-
बीसीसीआयचा मोठा निर्णय! कुठलाच भारतीय खेळाडू घालू शकणार नाही धोनीचा जर्सी नंबर 7, ‘हे’ आहे कारण
‘आम्ही प्लॅन बनवला होता…’, 106 धावांनी दक्षिण आफ्रिकेच्या नांग्या ठेचताच सूर्याचे मोठे विधान; वाचाच