दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (14 डिसेंबर) जोहान्सबर्गमध्ये खेळला गेला. सूर्यकुमार यादव या मालिकेत कर्णधाराच्या भूमिकेत खेळत आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये आपल्या वादळी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्याने गुरुवारी पुन्हा एकदा मैदानात धमाका केली. कारकिर्दीतील चौथे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक करत कर्णधाराने भारतीय संघाला 20 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 201 धावांपर्यंत पोहोचवले.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण आफ्रिकी गोलंदाज भारताच्या धावसंख्येवर नियंत्रण ठेवू शकले नाही. केशव महाराज याने सुरुवातीच्या दोन विकेट्स (शुबमन गिल आणि तिलक वर्मा) मिळवून दिली. पण तिसऱ्या विकेटसाठी दक्षिण आफ्रिका संघाला 10 षटकांची वाट पाहावी लागली. यशस्वी जयसवाल आणि सूर्यकुमार यादव यांनी शतकी भागीदारी केली. यशस्वी जयसवाल याने 41 चेंडूत 60 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादव याने 56 चेंडूत 100 धावांची अप्रतिम खेळी केली. सूर्यकुमारसाठी टी-20 कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले.
भारतीय संघासाठी इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सलामीवीर शुबमन गिल 8, तिलक वर्मा शुन्य, रिंकू सिंग 14, जितेश शर्मा 4 आणि रविंद्र जडेजा 4 धावा करून बाद झाले. अर्शदीप सिंग (0) आणि मोहम्मद सिराज (2*) नाबाद राहिले. (IND vs SA 3rd T20I South Africa needs 202 runs to win against India.)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्गर.
भारत: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, जितेश शर्मा (व), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्धची कसोटी बनली ऐतिहासिक, भारताकडून महिला क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन
IND vs SA । कसोटी मालिकेतून शमीचा पत्ता कट! समोर आली महत्वाची माहिती