दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ गुरुवारी (14 डिसेंबर) आमने सामने आहे. उभय संघांतील टी-20 मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना याठिकाणी खेळला जात आहे. या निर्णायक सामन्याची नाणेफेक दक्षिण आफ्रिका संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय संघ (Team India) तीन टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. उभय संघांतील टी-20 मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने जिंकला, तर मालिकेत यजमान संघाची बरोबरी करता येईल. उभय संघांतील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द केला गेला होता, तर मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने पराभव स्वीकारला होता.
उभय संघांतील या सामन्यात मार्को जॅन्सन आणि जेराल्ड कोएत्झी दक्षिण आफ्रिकेसाठी खेळताना दिसणार नाहीत. दुसरीकडे भारतीय संघात एकही बदल केला गेला नाही, असी माहिती स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली. (IND vs SA 3rd t20i South Africa won the toss opts to bowl first.)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्गर.
भारत: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, जितेश शर्मा (व), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
कुलदीप यादवच्या वाढदिवसानिमित्त चहलने व्हिडिओ शेअर करत मागितली माफी; म्हणाला, ‘याच्यासाठी…’
तिसऱ्या टी20त सूर्याकडे विराटचा ‘तो’ जबरदस्त Record मोडण्याची संधी, हवेत फक्त ‘एवढे’ षटकार