---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला जबाबदार कोण? केशव महाराजने ‘यांच्या’वर फोडलं अपयशाचं खापर

On: शनिवार, जून 18, 2022 8:05 AM
IND-vs-SA
---Advertisement---

शुक्रवारी (दि. १७ जून) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात चौथा टी२० सामना पार पडला. राजकोटच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ८२ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक ठरला. त्याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली होती. अशात आता भारताविरुद्ध सलग दुसरा सामना गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने पराभवाचं कारण सांगितले.

झाले असे की, या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर गेला होता. त्यामुळे सामन्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये त्याच्या जागी केशव महाराज (Keshav Maharaj) आला होता. यावेळी त्याने सांगितले की, दक्षिण आफ्रिका संघाला कोणत्या कारणामुळे या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

सामन्यानंतर काय म्हणाला केशव महाराज?
सामन्यानंतर बोलताना केशव महाराज म्हणाला की, “शेवटच्या षटकांमध्ये आम्ही योजनेनुसार फलंदाजी केली नाही, हे खरे आहे. मात्र, आम्हाला वाटते की, सामना संपेपर्यंत फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली झाली आहे. आम्हाला परिस्थिती समजू शकली नाही. पुढील सामन्यात आम्हाला अधिक सक्रिय राहावे लागेल. आम्ही सरळ पॉवरप्ले मोडमध्ये खेळलो. आमच्याकडून कोणतीही भागीदारी झाली नाही आणि सतत विकेट पडत राहिल्या.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, पण शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने शानदार फलंदाजी केली. आम्हाला एक चांगली रणनीती तयार करावी लागेल आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घ्यावी लागेल. भारतात फिरकीपटूंना छोट्या मैदानांवर गोलंदाजी करणे कठीण जाते. बंगळुरूमध्ये खूप मजा येईल अशी आशा आहे.”

सामन्याचा आढावा
भारतीय संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६९ धावा चोपल्या होत्या. यावेळी भारताकडून दिनेश कार्तिक याने २७ चेंडूत सर्वाधिक ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकारांचाही पाऊस पाडला. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव १६.५ षटकात अवघ्या ८७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

पुढील सामना निर्णायक
या ५ सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा होता.  कारण, या मालिकेतील सुरुवातीचे सलग २ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताला विजय मिळाला होता. हा सामना जर भारताने जिंकला नसता, तर संघाला मालिका गमवावी लागली असती. अशात दोन्ही संघांनी २-२ अशी बरोबरी साधली आहे. पुढील शेवटचा सामना उभय संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारताच्या ‘या’ दोन पठ्ठ्यांनी आफ्रिकेला घाम फोडलाय! चौथ्या सामन्यात केलं धमाकेदार प्रदर्शन

इंग्लंड संघाचा महारेकॉर्ड ! नेदरलँडविरुद्ध केली एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोधी धावसंख्या

भारताचे दमदार पुनरागमन! चौथ्या टी२० सामन्यात विजय मिळवत मालिकेत साधली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---