---Advertisement---

मेघराजामुळे रद्द झाली पाचवी टी२०, निराश चाहत्यांचा बीसीसीआयवर निशाणा; ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पूर

On: सोमवार, जून 20, 2022 7:44 AM
Chinnaswami-Stadium-Rain
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील पाचवा आणि निर्णायक टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. रविवारी (१९ जून) सामना सुरू झाल्यानंतर लगेचच बेंगलोरमध्ये पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे केवळ ३.३ षटकांचाच खेळ होऊ शकला आणि सामना रद्द करावा लागला. परिणामी ही ५ सामन्यांची टी२० मालिका २-२ ने बरोबरीत सुटली. यानंतर ट्वीटरकर्त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) निशाणा साधला आहे. 

रविवारी संध्याकाळी ६.३० वाजता सामन्यासाठी (INDvsSA) नाणेफेक झाली. त्यानंतर अर्ध्या तासाने खेळही सुरू झाला. सामना सुरू झाला मात्र, सुरुवातीलाच पहिला चेंडू फेकण्याआधीच पावसाने हजेरी लावल्याने खेळ सुरू होण्यास उशीर झाला. त्यानंतर खेळाच्या नियमात बदल करत १९ षटकांचा सामना खेळण्याचा निर्णय (Fifth T20I) घेतला. खेळ सुरू झाला.

पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार केशव महाराज गोलंदाजीस आला. इशान किशनने त्याच्या विरोधात दोन षटकार लगावत आपला निर्धार स्पष्ट केला. त्यानंतर मात्र, लुंगी एनगिडीच्या पहिल्या षटकात इशान किशन आणि नंतर दुसऱ्या षटकात ऋतुराज गायकवाड बाद झाले.

ऋतुराज बाद झाला, त्यावेळी भारताची धावसंख्या ३.२ षटकांत २७ धावांवर २ बाद अशी होती. त्यानंतर कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर फलंदाजी करत होते. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला. लवकरच पाऊस कमी होऊन सामना सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे (INDvsSA T20 Abandoned Due To Rain) दिसले. परिणामी मालिकाही २-२ ने बरोबरीत सुटली.

यानंतर क्रिकेट चाहते ट्वीटरवर व्यक्त होत आहे. अनेकांना या प्रसंगानंतर विराट कोहलीची आठवण झाली आहे. विराटची आयपीएलमधील फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे हे घरचे मैदान असल्याने काहींनी विराट या सामन्याचा भाग नसल्याने एम चिन्नास्वामी स्टेडियमलाही त्याच्याविना खेळणे मान्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच काहींनी हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या दर्शकांप्रती नाराजी व्यक्त केली आहे, ज्यांचे तिकीटाचे पैसे वाया गेले आहेत. 

https://twitter.com/FollowingLuv/status/1538561183627612160?s=20&t=ZSOlgat5jfxy_WqO19PcEw

https://twitter.com/__veeresh___/status/1538558158141988864?s=20&t=ycsqAWYhmZvfibB_z-laiw

https://twitter.com/_Cric_Mayur_/status/1538562170824577024?s=20&t=d4kRGzfFu1w8p2uUpXfHkw

https://twitter.com/Eftikar757/status/1538563273343508480?s=20&t=KQ-f-j3u6UJRXaP1imlqpQ

दरम्यान दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीचे २ सामने जिंकत मालिकेवर मजबूत पकड बनवली होती. परंतु त्यानंतर रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला व मालिका रोमांचक स्थितीत आणली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटसाठी २० जून का आहे सर्वात खास? घ्या जाणून

‘मागच्या वर्षी डावलले पण यावर्षी टी-२० विश्वचषकात चहल गेम चेंजर ठरणार’, माजी दिग्गजांचे भाकीत

ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही धोनीचा ‘जबरा फॅन!’, सोशल मीडियावर शेअर केली अभिमानास्पद पोस्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---