भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडिया आधीच दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. या मालिकेला 8 नोव्हेंबरपासून डर्बनमध्ये सुरूवात होईल. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा चेहऱ्यांना भारतीय संघात संधी मिळाली आहे. संजू सॅमसन पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याने या जबाबदारीसह बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत सलामीवीराची भूमिकाही बजावली होती. संजूला पुन्हा एकदा तीच भूमिका मिळू शकते. दरम्यान, मालिका सुरू होण्यापूर्वी माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने सॅमसनच्या अलीकडील कामगिरीबद्दल बोलले आणि एका महत्त्वाच्या गोष्टीची कमतरता देखील नमूद केली.
संजू सॅमसनने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून त्याने 33 टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या दरम्यान सॅमसनने 22.84 च्या सरासरीने केवळ 594 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून एक शतक आणि दोन अर्धशतके झळकली आहेत. बांग्लादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये संजूला फारशी कामगिरी करता आली नाही, मात्र त्यानंतर तिसऱ्या टी20मध्ये त्याने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने 47 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 111 धावांची खेळी खेळली.
जिओ सिनेमावर अनिल कुंबळे संजू सॅमसनबद्दल बोलताना म्हणाले “संजू सॅमसनला संघात ठेवण्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा होत आहे. अलीकडेच त्याने ठोकलेल्या शतकामुळे नक्कीच त्याला खूप आत्मविश्वास मिळाला असेल. संजू सॅमसनची क्षमता आम्हाला माहित आहे. तो एक चांगला फलंदाज आहे. पण त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. तसेच त्याच्याकडे मजबूत बॅकफूट गेम आहे. वेगवान गोलंदाजाविरुद्ध खेळण्यासाठी त्याच्याकडे विविध शाॅट्स आहेत. फिरकीपटूविरुद्ध तो आक्रमक फलंदाजी करु शकतो. दक्षिण आफ्रिकेतील चार सामन्यांमध्ये तो कसा कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल.
हेही वाचा-
INDA VS AUSA; केएल राहुल फ्लाॅप, ईश्वरन शून्यावर बाद, ऋतुराजकडूनही निराशा
रणजीत 6000+ धावा अन् 400 विकेट्स घेणारा पहिलाच, तरी देखील टीम इंडियात संधी नाही
IND VS SA; ‘हॉटस्टार किंवा सोनी’वर नाही, या ठिकाणी पाहा लाइव्ह सामना