भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना मंगळवारी (19 डिसेंबर) खेळला गेला. मलिकेतील पहिल्या सामन्यात मिळालेल्या परभवाचा बदला यजमान दक्षिण आफ्रिका संघाने या सामन्यात घेतला. भारतीय संघाला मंगळवारी या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 8 विकेट्सने पराभूत केले. टोनी डी झॉर्झी याचे शतक आफ्रिकेच्या विजयात महत्वाचे ठरले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने या सामन्यात 46.2 षटकात 211 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात 212 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी टोनी डी झॉर्झी याने 119* धावांची मॅच विनिंग खेळी केली. सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (52) यानेही अर्धशतकी योगदान दिले. रासी वॅन डर ड्युसेन याने 36, तर कर्णधार ऍडेन मार्करम 2* धावा करून नाबाद राहिला. अवघ्या 42.3 षटकांमध्ये भारताने विजय मिळवला. भारतासाठी एकूण आठ खेळाडूंनी गोलंदाजी केली. पण अर्शदीप सिंग आणि रिंकू सिंग यांनाच प्रत्येकी एक-एक विकेट घेता आली.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड अवघ्या 4 धावांवर बाद झाला. साई सुदर्शन याने मात्र सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केले. 83 चेंडूत 62 धावा केल्यानंतर साईने विकेट गमावली. तसेच कर्णधार केएल राहुल याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 64 चेंडूत 56 धावांची खेळी केली. तिलक वर्मा (10), संजू सॅमसन (12), रिंकू सिंग (17), अक्षर पटेल (7), कुलदीप यादव (1), अर्शदीप सिंग (18), आवेश खान (9) आणि मुकेश कुमार (4*) यांना मोठी खेळी करता आली नाही.
A comprehensive win for the Proteas as they level the series in Gqeberha 💪#SAvIND 📝: https://t.co/wOy7UylrlP pic.twitter.com/8axFAToAut
— ICC (@ICC) December 19, 2023
दक्षिण आफ्रिकेच्या विजयात त्यांच्या गोलंदाजांचे योगदान महत्वाचे राहिले. नांद्रे बर्गर याने तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. ब्युरन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच लिझाद विल्यम्स आणि ऍडेन मार्करम यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (IND vs SA. Easy win for South Africa in the second ODI)
महत्वाच्या बातम्या –
गुजरात जायंटस वरील विजयाने हरियाणा स्टीलर्स चौथ्या लढतीतही अपराजित
‘तू भारी आहेस! तूला मिळालेल्या प्रत्येक रुपयाचा तू लायक आहेस’ शास्त्रींनी कुणाचं केलंय कौतूक