भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) सतत पडत असलेल्या पावसामुळे रद्द करण्यात आला. डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट मैदानावर खेळला जाणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 7.30 वाजता सुरू होणार होता. मात्र, सततच्या पावसामुळे खेळपट्टी कव्हर्सने झाकून ठेवली गेली. पंचांनी जवळपास 2 तास वाट पाहिल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावर आता भारतीय संघाचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी सामना रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी मैदान पूर्णपणे कव्हर न केल्यामुळे क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डावर आगपाखडही केली.
काय म्हणाले गावसकर?
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “जर मैदान झाकून राहिले असते आणि पाऊस थांबला असता, तर तुम्हाला माहितीये की, एक तासापर्यंत पडला नसता. अचानक पाऊस सुरू होतो. त्यामुळे काहीही झालंं तरी, खेळ होणार नाही. प्रत्येकाला पैसे मिळत आहेत. कोणीही चूक करू नका. सर्व क्रिकेट बोर्डांकडे पैसे आहेत. जर ते नाही म्हणत असतील, तर ते खोटं बोलत आहेत. त्यांच्याकडे बीसीसीआयइतका पैसा नाहीये. मान्य आहे, पण प्रत्येक बोर्डाकडे पूर्ण मैदान झाकण्यासाठी हे कव्हर्स खरेदी करण्यासाठी पैसे आहेत.”
दोन्ही देशांचे निवडकर्ते या मालिकेकडे पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने पाहत आहेत. या मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाने काही मोठ्या खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंना संधी दिली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्रांती दिल्यानंतर भारतीय संघात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज पुनरागमन करत आहेत.
https://twitter.com/BrokenCricket/status/1734020535745761649
तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी20 सामना 12 डिसेंबर रोजी केबेरहाच्या सेंट जॉर्ज पार्क येथे खेळला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी आता भारतीय संघाला फक्त आणखी 5 टी20 सामने खेळण्यासाठी मिळणार आहेत. यातील 2 टी20 सामने चालू मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळले जातील. तसेच, 3 सामने अफगाणिस्तानविरुद्ध जानेवारीत मायदेशात खेळले जातील. (ind vs sa former cricketer sunil gavaskar fumes on csa after india vs south africa 1st t20i match washed out due to rain)
हेही वाचा-
IND vs SA: पहिला टी20 सामना टॉसशिवाय रद्द, पाऊस बनला व्हिलन
तिसऱ्या टी-20त भारताचा पाच विकेट्स राखून विजय! सलामीला आलेल्या स्मृती मंधानाची सर्वात मोठे खेळी