भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना रविवार, 30 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळाला. उभय संघांतील हा सामना पर्थवर खेळला गेला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण फलंदाज मात्र अपेक्षित खेळ दाखवू शकले नाहीत. प्रत्युत्तरात भारतासाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या. अर्शदीपला मिळालेल्या दुसऱ्या विकेटनंतर भारतीय खेळाडूंच्या प्रतिक्रिया सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
भारतीय संघासाठी या सामन्यातील पहिले षटक भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshear Kumar) घेऊन आला होता. त्याने तीन धावा दिल्या. दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) गोलंदाजीला आला. अर्शदीपचे हे पहिले षटक होते आणि पहिल्याच चेंडूवर त्याला मोठे यश मिळाले. दक्षिण आप्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक सलामीसाठी आला होता, पण अर्शदीपने त्याला अवघ्या एका धावेवर तंबूत धाडले. अर्शदीपला याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याची दुसरी विकेट देखील मिळाली. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रायली रूसो (Rilee Rossouw) अर्शदीपचा शिकार बनला.
रायली रूसो पायचीत पकडला गेल्यामुळे त्याला विकेट गमवावी लागली. असे असले तरी, मैदानातील पंचांनी मात्र सुरुवातील त्याला नाबाद करार दिला होता. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने डीआरएस घेतला. रोहितचा हा निर्णय अगदी योग्य ठरला आणि भारताला दुसरी विकेट अगदी स्वस्तात मिळाली. दक्षिण आफ्रिका संघ 3 धावांवर खेळत असताना त्यांना ही दुसरी विकेट गमावली. तिसऱ्या पंचांनी जेव्हा रायली रुसोला बाद घोषित केले, तेव्हा भारतीय संघातील खेळाडूंच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या.
https://twitter.com/swaroop__45/status/1586714345815232513?s=20&t=THuIr1QnaQ-CJwl6z44lgA
यावेळी सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल एकत्र उभे होते. स्टेडियमधील मोठ्या स्क्रीनवर आउट अशी अक्षर दिसताच या सर्वांनी उड्या मारायला सुरुवात केली. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या नुकसानावर 133 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने 40 चेंडूत सर्वाधिक 68 धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी
पर्मनंट है! अर्शदीप, पहिली ओव्हर आणि दक्षिण आफ्रिकेचे पानिपत; पाहून घ्या आश्चर्यकारक आकडेवारी