---Advertisement---

नेतृत्व सोडल्यानंतर दिसली विराटची पहिली झलक; सराव सत्राच्या शुभारंभाची क्षणचित्रे व्हायरल

kohli-in-sa
---Advertisement---

कसोटी मालिकेतनंतर १९ जानेवारीपासून दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (sa vs ind odi series) खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने पर्लमध्ये खेळले जातील, तर शेवटचा सामना केपटाऊनमध्ये होईल. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाने पर्लमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

विराट कोहलीने (virat kohli) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच चाहते त्याला या पोस्टच्या माध्यमातून पाहू शकतात. फोटोत विराटसोबत श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकुर दिसत आहेत. बीसीसीआयने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वनडे मोड ऑन. एकदिवसीय सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ बोलँड पार्कमध्ये पोहचला आहे.’ दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला (rohit sharma) एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले गेले होते. पण, तो नियमित कर्णधाराच्या रूपातील त्याच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेसाठी दुखापतीमुळे उपस्थित राहू शकला नाही.

रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल (kl rahul) ही जबाबदारी सांभाळेल. कर्णधाराच्या रूपातील केएल राहुलची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटीत त्याने नेतृत्व केले होते, पण संघाला या सामन्यात पराभव मिळाला. विराट कोहली दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यापूर्वी, त्याला आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्जच्या नेतृत्वाचा अनुभव आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटो राहुल संघातील सहकाऱ्यांना काहीतरी समजावताना दिसत आहे.

शिखर धवनने (shikhar dhawan) या मालिकेसाठी संघात पुनरागमन केले होते. मागच्या वर्षी जुलै महिन्यात भारतीय संघासोबत श्रीलंका दौरा केला होता आणि यावेळी संघाचे नेतृत्व देखील केले होते. त्यानंतर टी२० विश्वचषकात त्याला संधी मिळाली नव्हती. पण आता तो पुन्हा संघासोबत सामील झाला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचे धवनचे एकदिवसीय प्रदर्शन आतापर्यंत चांगले राहिले आहे. आगामी मालिकेत देखील त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडने देखील संघात स्थान बनवले आहे. पोस्टमध्ये तो देखील दिसत आहे. संघात सलामीसाठी ऋतुराज देखील एक चांगला पर्याय आहे. पोस्टमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील खेळाडूंना काही सुचना करताना दिसत आहेत.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, जयंत यादव, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्ण, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.

दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना: 19 जनवरी, 2022 (पार्ल)
दूसरा एकदिवसीय सामना: 21 जनवरी, 2022 (पार्ल)
तिसरा एकदिवसीय सामना: 23 जनवरी, 2022 (केप टाउन)

महत्वाच्या बातम्या –

“हा विराटने बनविलेला संघ, त्यामुळे…” विश्वविजेत्या खेळाडूची रोचक प्रतिक्रिया

ठरलं बर‌ का! या दिवशी ‘हिटमॅन’ पुन्हा दिसणार निळ्या जर्सीत

खुद्द रोहितच कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लावण्यात बनतोय अडथळा, पण कसं? वाचा सविस्तर

व्हिडिओ पाहा –

विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव। Kohli thanks Dhoni-Shastri

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---