दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ते भारताविरुद्ध पाच सामन्यांची या टी२० मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना आज (९ जून) खेळला जाणार आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरूवात होणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी रिषभ पंतकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
राहुल बरोबरच कुलदिप यादवही दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. हे वृत्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जाहीर केले असता याला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यातील तर एकाने पंत ऐवजी यष्टीरक्षक संजू सॅमसनला (Sanju Samson) कर्णधार करा असे सुचविले आहे.
या भारतीय चाहत्याने ट्विट करत म्हटले, “प्रिय बीसीसीआय आता योग्य वेळ आली आहे सॅमसनला कर्णधार म्हणून नेमण्याची, तो पंतची मदत देखील करेल.” तर, एकाने राहुलच्या जागी सॅमसनला संघात घ्या असे ट्विट केले आहे.
https://twitter.com/RockstarMK11/status/1534518222430814209?s=20&t=iFKS4mzpNqUtfVr8ePkEJQ
इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल्स संघाने पंत आणि युजवेंद्र चहलचा फोटो ट्विट केला आहे. त्यालाही चाहत्यांच्या मिश्र प्रतिक्रीया आल्या. यावेळी एका चाहत्याने पंतच्या जागी सॅमसन असायला पाहिजे असा रिप्लाय दिला. सॅमसन हा राजस्थानचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ १४ वर्षानंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता.
We want Sanju Samson here
— Avi (@RoyalAvi029) June 8, 2022
SANJU SAMSON SHOULD BE ANNOUNCED AS REPLACEMENT OF KL RAHUL.
RETWEET IF AGREE ???? pic.twitter.com/X5MlT0RUKg
— Cricket???? Lover // ICT Fan Account (@CricCrazyV) June 8, 2022
Sanju Samson will be a best Replacement for KL Rahul.#SanjuSamson
— #SHEKHAWAT???? (@Shekaw014) June 8, 2022
बीसीसीआयने ट्वीट करत सांगितले आहे की, “उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे, तर कुलदीप यादव काल संध्याकाळी नेटमध्ये फलंदाजी करताना उजव्या हाताला मार लागल्याने टी२० मालिकेला मुकणार आहे.”
निवड समितीने केएल राहुल (KL Rahul) आणि कुलदीप यादव यांच्या जागी कोणालाही संघात सामील केले नाही. दोघेही आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीए येथे उपचार घेतील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ
रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कर्णधार’ आझम विंडीजला पुरून उरला, खणखणीत शतक ठोकत विराटचा विश्वविक्रम मोडला
भारतीय संघाचे कर्णधारपद मिळताच हे काय बोलून गेला पंत; म्हणाला, ‘चांगल्या परिस्थितीत आले नाही…’






