नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२२मध्ये चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक, याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेच्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठान याने उमरानला मोलाचा सल्ला दिला आहे.
इरफानने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले का, “मी नेहमी उमरानला मार्गदर्शन करत असतो. तुला तुझ्या लाईन आणि लेंथवर लक्ष देत असताना आपली गती कमी करता कामा नये. चेंडू जितका यष्टीच्या सरळ रेषेत टाकता येईल तितका टाकायचा. शिवाय जास्तीत जास्त चेंडू हार्ड लेंथवर टाकण्याचा प्रयत्न करायला जेण करून फलंदाजाला खेळणे अवघड होईल.”
यावेळी इरफानने उमरानला आणखी एक सल्ला दिला आहे. इरफानने सांगितले की, “प्रत्येक सामना संपल्यानंतर स्वत:चे आत्मचिंतन करायला हवे. आज सामन्यांत कोणती गोष्ट चांगली केली यावर आणखी मेहनत घ्यायला हवी. शिवाय कोणती गोष्ट चुकली ती सुधारण्यासाठी सराव केला पाहिजे. आम्ही खुद्द सचिन तेंडुलकरला देखील ही गोष्ट करताना वेळोवेळी पाहिली आहे.”
उमरान मलिकने यंदाच्या हंगामात भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडीत काढला. उमरानने सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांत २२ बळी घेतले आहेत. यावेळी आयपीएलच्या एका हंगामात २०पेक्षा जास्त बळी घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे.
दरम्यान, उमरान आयपीएल पदार्पण करण्याआधी काश्मीरच्या संघाकडून रणजी चषक खेळत होता. त्यावेळी संघाचा प्रशिक्षक म्हणून इरफान पठीण त्याचा मेंटॉर होता. त्यानंतर उमरानच्या आयपीएल पदार्पणातदेखील इरफानचा मोलाचा वाटा आहे. उमरानच्या प्रत्येक सामन्यापूर्वी इरफान त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करताना दिसत आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐकलंत का! पाकिस्तानच्या माजी कर्णधारालाही आहे विराटवर विश्वास; म्हणतोय, ‘तो क्रिकेटच्या भल्यासाठी…’
‘या’ पाकिस्तानी खेळाडूची मुलगी रुग्णालयात देतेय मृत्यूशी झुंज
बापरे! नदालने फक्त बक्षीसांमधूनच कमावलेत हजारो कोटी, आकडा वाचून व्हाल थक्क