हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. पाच वेळा मुंबईला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर हार्दिक संघाचा नवीन कर्णधार बनला. आयपीएलचा आगामी हंगाम 22 मार्च रोजी सुरु होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी (18 मार्च) पत्रकार परिषदेत मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यानी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांनी काही असे प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे या दोघांनाही देता आली नाही.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. आगामी आयपीएलसाठी रोहितकडून मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद काढले आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघाचा नवा कर्णधार बनला. पण याचा परिणाम चाहत्यांमधील नाराजीमधून पाहायला मिळाला. संघ व्यवस्थापन आणि हार्दिक पंड्या यांच्यावर चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. अजूनही रोहितच्या चाहत्यांचा राग कमी झाल्याचे दिसत नाही. सोमवारी पत्रकार परिषदेत मुंबईचा नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर उपस्थित होते. अशात पत्रकारांनी देखील रोहित आणि मुंबईच्या कर्णधारपदाविषयी रोखठोक प्रश्न विचारले.
मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काही प्रश्न असे होते, ज्यांचे उत्तर हार्दिक आणि बाउचर देखील देऊ शकले नाहीत. त्यांना आधिच या प्रश्नांची उत्तरे न देण्यासाठी सुचना केल्या गेल्याचे सांगितले जात आहे. बाउचर यांना एक प्रश्न विचारला गेला की, संघ काय विचार करत होता की, कर्णधारपद रोहितकडून काढून हार्दिकला दिले गेले. या प्रश्नावर बाऊचर एकही शब्द बोलले नाही.
A question related to Rohit Sharma skipped by Mark Boucher. pic.twitter.com/4nW7MwACmK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 18, 2024
तसेच एक प्रश्न हार्दिक पंड्यालाही विचारला गेला, ज्यावर कर्णधारने न बोलणेच पसंत केले. मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या करारात कर्णधारपदाविषयी काही उल्लेख होता का? असा हा प्रश्न होता. हार्दिक आणि बाउचरसह आयोजिक देखील अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसले.
They skipped the question regarding to Captaincy Clause😭
Such a shameless Franchise @mipaltan pic.twitter.com/1Zn6abwlWV— Aditya (Modi ka Parivar) (@_adityapandey__) March 18, 2024
दरम्यान, मुंबईचा कर्णधार बनल्यानंतर हार्दिक पंड्या रोहित शर्माशी जास्त बोलला देखील नाहीये. दरम्यानच्या काळात रोहित व्यस्त असल्याचे कारण हार्दिकने दिले. हार्दिकला नियमित कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्ससोबत आमागी आयपीएल हंगामातील पहिला सामना 24 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायचा आहे. गुजरात टायटन्सचे आव्हान या सामन्यात मुंबईपुढे असेल. (Rohit Sharma and Mark Boucher stopped talking due to these two questions)
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स रेडी, नेट्समध्ये सॅमसनचा शॉट पाहून चहल सदम्यात
आयपीएल 2024 पूर्वी चेन्नईचा आणखी एक गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवर नेलं मैदानाबाहेर