---Advertisement---

आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स रेडी, नेट्समध्ये सॅमसनचा शॉट पाहून चहल सदम्यात

---Advertisement---

संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघ आगामी आयपीएल हंगामासाठी तयार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामासाठी सर्व संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्स देखील मागे नाहीये. राजस्थानच्या सर्व खेळाडंनी सराव सत्रासाठी हजेरी लावली आहे. कर्णधार संजू सॅमसन याचा सराव सत्रातील व्हिडिओ राजस्थानच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला गेला आहे. याच व्हिडिओत फिरकीपटू युझवेंद्र चहल नेट्सच्या मागे उभा राहून सॅमसनची फलंदाजी पाहत होता. यादरम्यानच चहलच्या तोंडून आलेले काही शब्द चर्चेचा विषय ठरत आहेत.

आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी होणार आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघ हंगामातील आपला पहिला सामना रविवारी (24 मार्च) लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळणार आहे. 2008 साली म्हणजेच आयपीएल पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. पण मागच्या 15 हंगामांमध्ये राजस्थानला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही.

संजू सॅमसन आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात राजस्थानने मागच्या काही हंगामांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले आहे. दुसरीकडे युझवेंद्र चहल हादेखील मागच्या दोन हंगामांपासून राजस्थान संघाचा भाग आहे. रविवारी (17 मार्च) राजस्थआन रॉयल्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला गेला. यात संजू सॅमसन नेट्समध्ये एकापेक्षा एक शॉट्स मारत आहेत. युझवेंद्र चहल मात्र, नेट्सच्या मागून सॅमसनच्या मोठमोठ्या शॉट्सचा आनंद घेत आहे. यादरम्यानच सॅमसचा एक शॉट पाहून युझवेंद्र चहल म्हणतो, “ओ तेरी, गेला हात तर(चेंडू).”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals) 

दरम्यान, यावर्षी राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. मागच्या हंगामात लीग स्टेजच्या 14 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये राजस्थानने विजय, तर सामन्यात पराभव स्वीकारला होता. प्लऑफमसाठी अवघा एक विजय कमी पडल्यामुळे राजस्थान रॉयल्सचा आयपीएल 2023 मधील प्रवास लीग स्टेजच्या पुढे थांबला. पण आगामी हंगामात सॅमसनच्या नेतृत्वात संघ पुन्हा एकदा विजेतेपदसाठी प्रयत्न करेल. (IPL 2024 Video of Sanju Samson and Yuzvendra Chahal in Nets goes viral)

महत्वाच्या बातम्या – 
पाकिस्तानची फजीती, PSL 2024च्या अंतिम सामन्याआधी पत्रकारांकडून बहिष्कार; वाचा संपूर्ण प्रकरण
CSK vs RCB सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांची चढाओढ, बुकिंग सुरू होताच वेबसाइट क्रॅश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---