भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वाँडरर्स क्रिकेट स्टेडियमवर 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा व शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधाराने असे काही केले ज्याने सर्वांचे मन जिंकले. वास्तविक, सोशल मीडियाच्या सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टीम इंडिया जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा विकेट पडल्याचा आनंद साजरा करत आहे. तेव्हा रिंकू सिंगने घातलेली भारतीय कॅप मैदानात पडली आहे. सूर्या चुकून त्यावर पाऊल टाकतो. यानंतर तो उत्सहात जातो आणि टोपी उचलतो. यानंतर तो कॅपला किस करुन पाया पडून रिंकूकडे देतो. त्याच्या चाहत्यांना हा हावभाव खूप आवडला आहे.
पाहा व्हिडिओ-
The way Suryakumar Yadav picked up the cap and touched on his head, shows his ethics and deep-rooter respect for our nation 🇮🇳 @surya_14kumar #INDvSA
— Madhav Sharma (@HashTagCricket) November 16, 2024
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना 135 धावांनी जिंकून मालिका 3-1 ने जिंकली. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्याकडून आतषी फलंदाजी पाहायला मिळाली. ज्यामध्ये भारताने 20 षटकांत 1 विकेट गमावून 283 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 18.2 षटकांत 148 धावांवरच मर्यादित राहिला. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने भारतीय संघाकडून सर्वाधिक 3 बळी घेतले.
सॅमसन आणि वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी केवळ 93 चेंडूत केलेली 210 धावांची भागीदारी ही भारतासाठी या फॉरमॅटमधील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. हैदराबादच्या 22 वर्षीय तिलकने केवळ 47 चेंडूत 9 चौकार आणि 10 षटकार ठोकले आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग शतके ठोकणारा दुसरा भारतीय ठरला. कर्णधार सूर्यकुमार यादवने नेतृत्व क्षमता दाखवणाऱ्या या युवा प्रतिभेला संधी देण्यासाठी आपली आवडती फलंदाजी क्रमांक सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा-
कर्णधार असावा तर असा! तिलक वर्मासाठी सूर्यानं केला मोठा त्याग, जाणून घ्या
“याबद्दल कॅप्टन सूर्याचे आभार… “, मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर तिलक वर्मा काय म्हणाला…
IPL 2025; मेगा लिलावासाठी भारताचा माजी कर्णधार बनला परदेशी खेळाडू, जाणून घ्या कारण