भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील बहुचर्चित तिसरा टी२० सामना मंगळवारी (१४ जून) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. दिल्ली आणि कटक येथील सलग दोन सामने जिंकत पाहुणा संघ या मालिकेत २-०ने पुढे आहे. या तिसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.
डॉ. व्हायएस राजशेखर रेड्डी स्टेडियम येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भुवनेश्वर (Bhuvneshwar Kumar) याने पॉवरप्लेमध्ये एक विकेट घेतली, तर तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनणार आहे. सध्या हा विक्रमात वेस्टइंडिजचा सॅम्युएल बद्री, भुवनेश्वर आणि न्यूझीलंडचा टीम साउदी हे संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
३३ – सॅम्युएल बद्री (५० डाव)
३३ – भुवनेश्वर कुमार (५९ डाव)*
३३ – टीम साउदी (६८ डाव)
२७ – शाकिब अल हसन (५८ डाव)
२६ – जोश हेजलवुड (३० डाव)
भारताने कटक येथे झालेला दुसरा टी२० सामना गमावला असला, तरी भुवनेश्वरनेची गोलंदाजी विशेष ठरली होती. त्याने ४ षटके टाकताना १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये त्याने ड्वेन प्रिटोरियस, रस्सी व्हॅन डर डुसेन आणि रिजा हेंड्रिक्स यांना एकेरी धावेवर बाद केले होते.
भारतीय संघासाठी एखाद्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चार विकेट्स घेणाची कामगिरी जास्त गोलंदाज करू शकले नाहीत. आतापर्यंतच्या टी-२० च्या इतिहासात भारताचे फक्त ८ असे खेळाडू झाले आहेत, ज्यांनी एखाद्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या असतील. त्यातही भुवनेश्वर एकटाच असा आहे, ज्याने ही कामगिरी ३ वेळा केली आहे. इतर सर्वांनी प्रत्येकी एक-एक वेळा ही कामगिरी केली आहे.
दुसऱ्या सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही भुवनेश्वरने चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा असणार आहे. त्याने ६१ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ६३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये १२१ सामन्यात १४१ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsSA T20: कार्तिकच्या आधी अक्षर पटेल फलंदाजीला आल्याने भारताच्या माजी दिग्गजाने सुनावले खडे बोल
नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या पारड्यात, मालिका वाचवण्यासाठी भारत मैदानात; पाहा प्लेइंग इलेव्हन
धावला.. गोंधळून थांबला.. खेळ खल्लास झाला..! विल यंग धावबाद, बेन स्टोक्सने दाखवली कमालीची चपळता