भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी२० सामना १४ जूनला विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात भारताने ४८ धावांनी पाहुण्या संघावर मात करत मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. पाच सामन्याच्या या टी२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ २-१ने पुढे आहे. चौथा सामना शुक्रवारी (१७ जुन) राजकोट येथे होणार आहे. तिसऱ्या सामन्यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची मस्करी केली त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बक्षिस वितरणानंतर पुन्हा एकदा चहल टीव्हीने पुनरागमन केले होते. यावेळी ऋतुराज आणि चहल एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. यादरम्यान ऋतुराजने त्याच्या शरीरयष्टीची चेष्टा केली आहे. चहलने ऋतुराजला त्याच्या तंदुरूस्तीचे रहस्य विचारले असता, त्याने तुमच्यासारखे लोक जिममध्ये जाऊन दुसऱ्यांना प्रेरित करता असे म्हटले आहे. हा व्हीडिओ बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) त्यांच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे.
चहलने ही स्थिती अजून विनोदी बनवत ‘माझ्यासारखे लोक म्हणजे कोण?’ असा प्रश्न विचारला आहे. या व्हीडिओमध्ये चहलच्या विधानावर दोघेही हसले आहेत.
Chahal TV is BACK! ???? ????
Enjoy this special segment of @yuzi_chahal chatting up with @Ruutu1331 after #TeamIndia's win in Vizag. ???? ???? – By @28anand
Full interview ???? ???? #INDvSA | @Paytm https://t.co/nzzoyQBrPO pic.twitter.com/28DH2xK3zt
— BCCI (@BCCI) June 15, 2022
ऋतुराजने तिसऱ्या सामन्यात तुफानी फलंदाजी करत अर्धशतक केले होते. या सामन्यात त्याने एन्रीच नोर्कियाच्या ५व्या षटकामध्ये ५ चौकार लगावले होते. त्याने ३५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. त्याने इशान किशन (Ishan Kishan) सोबत ९७ धावांची भागीदारी करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली होती. नंतर हार्दिक पंड्याने नाबाद ३१ धावांची खेळी केल्याने भारताच्या २० षटकात ५ विकेट्स गमावत १७९ धावा झाल्या.
या सामन्यात भारताकडून उजव्या हाताच्या गोलंदाजांनी कमाल केली. फिरकीपटू चहलने रस्सी व्हॅन डर डुसेन, ड्वेन प्रीटोरियस आणि हेन्रिच क्लासेन या तीन प्रमुख फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग सोपा केला. त्याला हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांनी योग्य साथ दिली.
भारत या मालिकेत रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग सात सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडीत केली आहे. विजयी क्रम चौथ्या सामन्यात कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका मालिका जिंकण्याचा हेतूने मैदानात उतरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs SA | चौथ्या टी२० सामन्यात ‘या’ ६ खेळाडूंवर असेल विशेष जबाबदारी






