दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने ८२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. या विजयाचा पाया दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने रचला. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील पहिलेवहिले अर्धशतक ठोकले. त्याने तुफानी खेळी करत टिकाकरांचे तोंड बंद केले आहे. त्याच्या या अप्रतिम खेळीची सर्वत्र कौतुक होत असताना त्याच्या जुन्या इन्स्टाग्रामची पोस्टला रोहित शर्मा (Rohit Sharma)याने केलेली कमेंट चांगलीच व्हायरल होत आहे.
कार्तिकने जुलै २०२१मध्ये त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. त्याला ‘जस्ट मी बीइंग मी (मी जसा आहे तसा)’ असे कॅप्शन दिले होते. या पोस्टला रोहितने ‘तुझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे,तुझ्या माहितीसाठी सांगतो’ ही कमेंट केली असता ती सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. याला कार्तिकने रोहितला रिप्लाय देत म्हटले, ‘या गोष्टीवर कधी शंका घेऊ नको’.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना कार्तिकने सुमारे तीन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. इंडियर प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) त्याला संघातून वगळले होते. यानंतर त्याची कारकिर्द संपली अशा चर्चा होत होत्या. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) संधी दिली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत त्याने उल्लेखनीय कामगिरी करत निवडकर्त्यांना संघात घ्यायला भाग पाडले.
https://www.instagram.com/p/CRRHNY1pAx9/?utm_source=ig_web_copy_link
कार्तिकने आरसीबीसाठी अनेक सामन्यात फिनीशरची भुमिका पार पाडली होती. अशीच कामगिरी पुढे सुरू ठेवत त्याने भारताला जिंकण्यास आवश्यक असणाऱ्या चौथ्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २७ चेंडूत ५५ धावा केल्या होत्या. त्याची आयर्लंड दौऱ्यातही निवड झाली आहे. या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यामध्ये दोन टी२० सामने खेळले जाणार आहे.
राजकोटच्या सामन्यानंतर कार्तिकचा अजून एक फोटो व्हायरल होत आहे. त्याने स्काय स्पोर्ट्सच्या द हंड्रेडसाठी समालोचन केले होते. त्याने पहिल्या आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) कसोटी अजिंक्यपदाच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या अंतिम सामन्यात समालोचन केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विषय आहे का! मुंबईने विक्रमी ४७व्यांदा गाठली फायनल, अंतिम सामन्यात ‘या’ संघाचे आव्हान
संघात स्थान मिळाले, पण खेळण्याची संधी नाही; राहुल त्रिपाठीबाबत माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
‘कर्णधार’ म्हणून पहिली टी२० मालिका जिंकण्याची पंतकडे संधी, सीरिज गमावल्यास मोडेल ‘तो’ अजेय विक्रम