---Advertisement---

टीम इंडिया फायनलसाठी बार्बाडोसला पोहोचली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका रंगणार अंतिम सामना

On: शुक्रवार, जून 28, 2024 1:39 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना बार्बाडोस येथे होणार आहे. यासाठी टीम इंडिया बार्बाडोसला पोहोचली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू विमानतळावर दिसले. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी टीम इंडियाचा एक व्हिडिओ समोर आला. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. आता तो फायनलसाठी सज्ज झाला आहे.

वास्तविक, ANI ने ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर दिसत आहेत. कोहली, रोहित, यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह आणि द्रविड यांच्यासह टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ बार्बाडोसला पोहोचला आहे. भारताला शनिवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. यंदाच्या  टी20 विश्वचषकात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताने आतापर्यंत स्पर्धेत एकाही सामना गमवला नाही.

टी20 विश्वचषक 2024 मधील अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. फायनलसाठी पात्र झालेल्या दोन्ही संघांनी स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. दोन्ही संघ या टी20 विश्वचषकात आतापर्यंत अपराजित आहेत. दक्षिण आफ्रिकेने 8 मधील 8 सामने जिंकले आहेत. तर बारतीय संघाने 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत तर एका सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. सेमीफायनलमधील भारताने इंग्लड विरुद्ध 68 धावांनी विजय मिळवला आहे तर दक्षिण आफ्रिका पहिल्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला होता.

महत्तवाच्या बातम्या-

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात या स्टार खेळाडूला मिळालं ‘सर्वोत्तम क्षेत्ररक्षकचा’ पदक
रोहित शर्मासह राहुल द्रवीडने केली विराट कोहलीची पाठराखण
“एक अकेला सब पर भारी” अक्षर पटेल फाॅर्मात, इंग्लंड कोमात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---