WTC Point table: केपटाऊन कसोटीत भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. या विजयाचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाने पॉइंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसह सर्व संघांना मागे टाकले आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासह फलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची टक्केवारी घसरली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना त्यांनी जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे त्यांचे बरेच नुकसान झाले. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 54.16 आहे. तर दक्षिण आफ्रिकेची 50 टक्के आहेत. भारतीय संघाने चार सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी दोन सामने जिंकले आहेत. एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताचे एकूण 26 गुण आहेत. (ind vs sa team india reached on top world test championship points table after win cape town test)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2025च्या (World Test Championship 2025) पॉइंट टेबलवर नजर टाकली तर भारत पहिल्या स्थानावर आहे आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडची विजयाची टक्केवारीही 50 आहे. ते दोन सामने खेळला आहेत. या कालावधीत एक सामना जिंकला असून एक सामना हरला आहे. न्यूझीलंडचे 12 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश पाचव्या क्रमांकावर आहे.
India move to the top 📈
More ➡️ https://t.co/2juF4qgC6D pic.twitter.com/bFSICZUXux
— ICC (@ICC) January 5, 2024
विशेष म्हणजे केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावा करून सर्वबाद झाला होता. तर दुसऱ्या डावात त्यांनी 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 153 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स गमावून हा सामना जिंकला. दुसऱ्या डावात भारताने 3 विकेट्स गमावून 80 धावा केल्या. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि डीन एल्गर (Dean Elgar) यांची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड करण्यात आली. (World Test Championship A big win against Africa! Team India reached the point table of WTC)
हेही वाचा
Ranji Trophy: काय सांगता! बिहारने मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यासाठी चक्क दोन संघ केले जाहीर, वाचा नक्की काय आहे प्रकरण
IND vs SA: मास्टर ब्लास्टरही झाला बुमराहाच्या गोलंदाजीवर खूश, म्हणाला, ‘त्याने दाखवले की…’