भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका मंगळवारी (26 डिसेंबर) होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या दिवशी खेळला जाणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखले जाते. या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या सरावाला सुरूवात झाली असून विरष्ठ खेळाडू संघासोबत जोडले गेले आहेत. अशातच कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह संपूर्ण संघ मोकळ्या वेळात फिरायला गेल्याचे दिसते.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग नव्हते. या वरिष्ठ खेळाडूंसह शुबमन गिल, रविचंद्रन अश्विर आणि शार्दुल ठाकूर हे खेलाडू कसोटी मालिकेसाठी भारतीय संघासोबत जोडले गेले आहेत. 26 डिसेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघाकडे एक दिवसाचा मोकळा वेळ होता. अशात संघातील खेळाडूंनी या मोकळ्या वेळात मैदानाबाहेर फिरण्याचा आनंद लुटला. यावेळ संघासोबत सपोर्ट स्टाफचे सदस्य आणि रोहित शर्माचे कुटुंब देखील उपस्थित होते.
Team India enjoying the break day in South Africa. pic.twitter.com/lbxOSkzNbD
— Johns. (@CricCrazyJohns) December 24, 2023
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (सी), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह vc), प्रसिध कृष्णा, केएस भरत (wk)
(ind-vs-sa-test-series-team-india-enjoying-the-break-day-in-south-africa)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
26 ते 30 डिसेंबर 2023 – पहिला कसोटी सामना, सुपर स्पोर्ट्स पार्क, सेंचुरियन
03 ते 07 जानेवारी 2024 – दुसरा कसोटी सामना, न्यूळँड्स, कॅप टाऊन
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडिया वुमेंसचा ऐतिहासिक विजय, पुरुष संघाशी खास कनेक्शन, वाचून तुम्हीही व्हाल थक्क
टीम इंडियावरील संकट टळलं! दिग्गज खेळाडूविषयी खुशखबर, नेतृत्वाचा मिटणार प्रश्न; लगेच वाचा