मागील वर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादव याने भारताकडून खेळताना त्याच्या कामगिरीत सातत्य राखले आहे. तो यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने यावर्षी 21 सामन्यांत 40.66च्या सरासरीने 732 धावा केल्या आहेत. तो जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा अनेक विक्रमे रचतो. अशातच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करताना अनेक विक्रम नावावर केले. दुसऱ्या सामन्यातही त्याला आणखी एक विक्रम रचण्याची संधी आहे.
भारताचा चौथ्या क्रमांकाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये उशिरा पदार्पण केले असले, तरी त्याने त्याची एक ओळख निर्माण केली आहे. यामुळे अनेकांनी त्याला भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्लाही दिला आहे. स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू पाठवत उत्तम शॉट्स खेळणाऱ्या सूर्यकुमारला आता अनुभवी फलंदाज विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला एमएस धोनी यांच्या यादीत सामील होण्याची संधी आहे.
सूर्यकुमारने आतापर्यंत 32 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 39.04च्या सरासरीने 976 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 8 अर्धशतके केली आहेत. त्याला आता 1000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट होण्याची संधी आहे. यासाठी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 24 धावा पूर्ण करताच तो ही कामगिरी करणार आहे. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 किंवा 1000 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये भारताचे विराट आणि रोहित यांच्यासह सहा खेळाडू आहेत. यामुळे सूर्यकुमारने 1000 धावांचा टप्पा गाठला तर तो भारताचा नववा खेळाडू ठरणार आहे.
रोहितने 140 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 3694 धावा केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तर विराट हा 108 सामन्यांमध्ये 3663 धावा करत तिसऱ्या स्थानावर आहे.
केएल राहुल याने 2080 धावा केल्याने तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्यानंतर शिखर धवन (1759), एमएस धोनी (1617), सुरेश रैना (1605), युवराज सिंग (1177) आणि श्रेयस अय्यर (1029) यांचा क्रमांक लागतो. हार्दिक पंड्या हा 989 धावा करत नवव्या स्थानावर आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे, तर तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदौर येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर चाहत्यांची इच्छा झाली पूर्ण! विदेशी लीग खेळणार रैना
“बाबर अपयशाला घाबरतो!’; माजी भारतीय खेळाडूची खरमरीत टीका
इरफानच्या मुलालाही कळाली वडिलांची बॅटिंग, पाहा सचिनने विचारलेल्या प्रश्नावर काय म्हणाला इमरान