---Advertisement---

फॉर्मात परतलेल्या रोहितची बॅट स्कॉटलँडविरुद्ध ओकणार आग! अर्धशतक करताच बनेल ३ हजारी मनसबदार

On: शुक्रवार, नोव्हेंबर 5, 2021 2:49 PM
ROhit Sharma
---Advertisement---

शुक्रवार रोजी (०५ नोव्हेंबर) भारतीय संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मधील त्यांचा चौथा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. दुबई येथे स्कॉटलँड संघाबरोबर त्यांची भिडंत होणार आहे. उपांत्य फेरीतील अपेक्षा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्याकडे मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे.

रोहित बनेल ३०० हजारी मनसबदार 
भारतीय संघाचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा नुकताच दमदार फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने मागील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धुव्वादार फलंदाजी केली होती. हीच लय कायम राखत आता तो स्कॉटलँडविरुद्धही मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल. जर त्याने स्कॉटलँडविरुद्ध ४८ धावा फटकावल्या. तर तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील आपल्या ३००० धावा पूर्ण करेल. आतापर्यंत त्याने टी२० क्रिकेटमध्ये ११४ सामने खेळताना ३२.०९ च्या सरासरीने २९५२ धावा केल्या आहेत.

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितव्यतिरिक्त फक्त २ फलंदाजांनी ३००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये विराट कोहली सर्वाधिक ३२२५ धावांसह अव्वलस्थानी आहे. तर न्यूझीलंडला मार्टिन गप्टिल ३०६९ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

हार्दिक पंड्याचे षटकारांचे शतक
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडेही षटकारांचे शतक पूर्ण करण्याची संधी असेल. जर त्याने स्कॉटलँडविरुद्धच्या सामन्यात २ षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले १०० षटकार पूर्ण करेल. त्याने आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांमध्ये १२ षटकार, ६३ वनडे सामन्यांमध्ये ५४ षटकार आणि ५१ टी२० सामन्यांमध्ये ३२ षटकार मारले आहेत.

चहलवर वरचढ ठरणार बुमराह
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या युझवेंद्र चहलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये ६३ विकेट्स घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराह ६२ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे स्कॉटलँडविरुद्ध १ विकेट घेत बुमराहकडे चहलची बरोबरी करण्याची संधी असेल. याखेरीज जर त्याने १ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या तर तो चहलला मागे टाकेल.

महत्त्वाच्या बातम्या-

इतका राग…! झेल सुटला म्हणून गोलंदाजाची आपल्याच सहकाऱ्याला भर मैदानात शिवीगाळ, पाहा व्हिडिओ

न्यूझीलंडशी भिडण्यासाठी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभा राहिला भारत, अश्विनने दिली मदतीची ‘ऑफर’

न्यूझीलंड आणि इंग्लंडने नकार दिल्यानंतर आता ‘हा’ संघ जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---