भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील दुसरा टी20 सामना गुरूवारी (5 जानेवारी) खेळला जाणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मैदानावर 2012पासून केवळ तीनच आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले. त्यातील दोन सामने भारताने जिंकले आहेत. भारताने या मैदानावर शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्धच खेळला होता. तेव्हा विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारताने 78 धावांनी विजय मिळवला होता. तर याआधी झालेल्या सामन्यात मात्र श्रीलंकेने बाजी मारली होती. यामुळे आता होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ चांगलीच टक्कर देणार आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळले गेले 3 आंतरराष्ट्रीय टी20-
भारताने या मैदानावर सर्वात पहिला सामना 2012मध्ये खेळला होता. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारत 5 विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 158 धावांचे लक्ष्य दिले होते. तो सामना एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने 13 चेंडू शिल्लक राखत जिंकला होता.
या मैदानावर भारताने दुसरा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. 2016मध्ये झालेल्या त्या सामन्यात भारत 101 धावांवरच गारद झाला होता. हा सामना श्रीलंकेने 5 विकेट्स आणि 12 चेंडू शिल्लक राखत जिंकला होता.
या मैदानावर शेवटचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात च झाला होता. यामध्ये केएल राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी खेळी केली होती. ज्यामुळे भारताने 201 धावसंख्या उभारली होती. लक्ष्य पार करताना श्रीलंकेचा डाव 123 धावांवरच संपुष्टात आला होता. हा सामना भारताने 78 धावांनी जिंकला होता.
पुण्याची खेळपट्टी-
या स्टेडियमची खेळपट्टी पाहिली तर पहिल्या डावात 153 आणि दुसऱ्या डावात 128 धावसंख्या होऊ शकते. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक असून फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. मागील सामन्यांचे निकाल पाहिले तर या खेळपट्टीवर लक्ष्य मोठे नसले तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना संघ जिंकला आहे.
या दोन्ही संघातील पहिला सामना मुंबईमध्ये खेळला गेला. जो भारताने अवघ्या दोन धावांनी जिंकला. यामुळे तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील भारत 1-0 असा आघाडीवर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ
एफसी गोवा घरच्या मैदानाचा फायदा उचलणार, हैदराबादला टक्कर देणार