भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. त्यापासून तो फक्त एक पाऊल दूर आहे. असे करताच, तो भारतीय संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात काय आहे तो विक्रम…
रोहित शर्माकडे विक्रमाची संधी
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. या सामन्यात रोहितने फक्त 1 धाव काढताच, त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला जाईल. त्याने आतापर्यंत सर्व क्रिकेट प्रकारात भारताच्या विजयात एकूण 11999 धावांचे योगदान दिले आहे. अशात पुढील सामन्यात त्याला 12000 धावांचा आकडा करण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. तसेच, त्याला भारताला विजयदेखील मिळवून द्यावा लागेल. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0ने आघाडी विजयी घेतली आहे.
‘या’ फलंदाजांनी केलाय असा कारनामा
आतापर्यंत विराट कोहली (Virat Kohli) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या दोन दिग्गजांनी हा कारनामा करून दाखवला आहे. माजी कर्णधार विराट कोहली याने भारतीय संघाच्या विजयात एकूण 16119 धावांचे योगदान दिले आहे. तसेच, अव्वलस्थानी असलेल्या सचिन तेंडुलकर याने भारताच्या विजयात एकूण 17113 धावांचे योगदान दिले आहे. रोहित या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच, भारताचा माजी फलंदाज आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड 10860 धावांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
रोहितने आतापर्यंत खेळलेत 430 आंतरराष्ट्रीय सामने
भारतीय संघाकडून 2007मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्मा याने आतापर्यंत भारताकडून एकूण 430 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात 45 कसोटी, 237 वनडे आणि 148 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा समावेश आहे. कसोटीत त्याने 3137, वनडेत 9554 आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 3853 धावा कुटल्या आहेत. (ind vs sl 3rd odi rohit sharma on the verge of joining legend sachin tendulkar and virat kohli in special club)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेफाली- श्वेताची झुंज यशस्वी, दक्षिण आफ्रिकेला लोळवत 19 वर्षांखालील विश्वचषकात विजयी सुरुवात
मोईन अलीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या बाबतीत विराटसारखा खेळाडूच नाही’