भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन आता भारताचा दुसरा गोलंदाज बनला आहे आणि कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वतः कपिल देव यांनी पत्र लिहून अश्विनला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी संपूर्ण कारकिर्दीत ४३४ कसोटी विकेट्स घेतल्या. अश्विन (Ravichandran Ashwin) याने त्यांचा हा विक्रम मोडला आहे. तो आता ४३६ कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे (Anil Kumble) आहेत, ज्यांनी कारकिर्दीत भारतासाठी सर्वाधिक ६१९ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
कपिल देव यांनी लिहिलेल्या पत्राची माहिती देताना अश्विन बुधवारी म्हणाला, “कपिल देव यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. कधी-कधी लोक विसरतात की, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांसारख्या लोकांमुळे ज्यांनी त्यांच्या काळात अविश्वसनीय काम केले आहे, त्यामुळेच मी आज याठिकाणी बसलो आहे.”
कपिल देव यांचा विक्रम मोडल्यानंतर काय वाटत आहे? अशा प्रश्नावर अश्विन म्हणाला, “जर मी याला एक स्वप्न म्हटले, तर योग्य ठरेल. मी एवढ्या विकेट्स घेण्याचा विचार कधीच केला नव्हता. मी काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. १९९४ मध्ये, मला स्पष्ट आठवते आहे की, मी माझ्या वडिलांसोबत बसलो होतो. आम्ही पाहत होतो की, ते खूप उत्सुक होते. आजू-बाजूला शेजारी सामना पाहण्यासाठी जमले होते आणि मला महिती नव्हते की, पुढे काय पाहत आहोत. तेव्हा मला समजले की, माझे वडील रिचर्ड हेडलीच्या जवळ पोहोचलेल्या कपिल देवसाठी खुश होते. मी त्यांना याचे महत्व विचारले आणि त्यांनी मला सांगितले की, कपिल देव पुढे जाऊन जागतील सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज बनेल.”
“मी याविषयी खूप उत्सुक होतो आणि वृत्तपत्रात याविषयी खूप काही वाचले. माझ्यासाठी त्यावेळी एका भारतीयाने अशी कामगिरी करणे खूप अविश्वसनीय होते. आपण अशा लोकाचे खूप आभारी असलो पाहिजे. तसेच आपण जे करत आहोत, त्यामध्ये आपण खूप विनम्र असले पाहिजे. मला खूप चांगले वाटत आहे.” असे अश्विन पुढे बोलताना म्हणाला.
कपिल देव यांनी केले होते कौतुक
यापूर्वी एका मुलाखतीत कपिल देव यांनी अश्विनने त्यांचा विक्रम मोडल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, ‘ही एक मोठी कामगिरी आहे. खरं करून एका अशा खेळाडूसाठी, ज्याला अलिकडच्या दिवसांमध्ये खास संधी मिळालेल्या नाहीत. जर त्याला या संधी मिळाल्या असत्या, तर त्याने खूप आधी ४३४ विकेट्सचा टप्पा पार केला असता. मी त्याच्यासाठी खुश आहे, मी त्याला का अडवू ? माझी वेळ गेली आहे.’
‘अश्विन एक अप्रतिम क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट आणि बुद्धिमान स्पिनर आहे. त्याला आता ५०० कसोटी विकेट्सचा लक्ष्य पार करायचे आहे. मला विश्वास आहे की, यापेक्षा जास्त विकेट्स घेईल’, असेही कपिल देव म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या –
वयाच्या ३९ व्या वर्षी झुलन गोस्वामीने रचला इतिहास; विश्वचषकात थेट जागतिक विक्रमाची बरोबरी
‘जॉनी बेयरस्टो आयपीएल खेळतो का?’, इरफान पठाणने असा प्रश्न का विचारला
Video: सीएकेच्या उथप्पाचा अनोखा सराव, पहिल्या सामन्यापासून प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळू शकते संधी