---Advertisement---

आता बंगळुरूचं मैदानही गाजवण्यासाठी ‘जड्डू’ सज्ज; मारणार एकाच दगडात दोन पक्षी!

On: शुक्रवार, मार्च 11, 2022 8:03 PM
All-Rounder-Ravindra-Jadeja
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला शनिवारपासून (१२ मार्च) सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतून कहर कामगिरी केली. त्याने पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना १७५ धावा कुटल्या होत्या. तसेच, गोलंदाजी करताना ९ विकट्सही चटकावल्या होत्या. अशात जडेजाकडे दुसऱ्या कसोटी सामन्यात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे.

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५८ सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने ११० डावांमध्ये २.४२ च्या इकॉनॉमी रेटने २४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला बंगळुरूच्या दुसऱ्या कसोटीत ९ विकेट्स घेत आपल्या २५० विकेट्स पूर्ण करून मोठा विक्रम करण्याची संधी आहे. त्याने कसोटीत आतापर्यंत ३६.४६ च्या सरासरीने २३७० धावाही केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शतके आणि १७ अर्धशतकेही ठोकली आहेत.

जडेजाला २५० विकेट्स घेण्याची सुवर्णसंधी
जगातील अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू जडेजा बंगळुरू कसोटीत ९ विकेट्स घेताच भारतासाठी सर्वात वेगवान २५० विकेट्स घेणारा आर अश्विन आणि अनिल कुंबळेनंतर तिसरा गोलंदाज बनेल. याव्यतिरिक्त त्याच्याकडे २५०० धावा आणि २५० विकेट्स पूर्ण करण्याचीही संधी असेल. जडेजाच्या नावावर कसोटीत ८५ डावांमध्ये २३७० धावा आहेत. त्याला २५०० धावा पूर्ण करण्यासाठी १३० धावांची आवश्यकता आहे.

जडेजा करू शकतो २५०० धावा आणि २५० विकेट्स घेण्याचा कारनामा
जर जडेजाने बंगळुरूमध्ये मोहालीत केलेली कामगिरी केली, तर तो त्याच्या २५०० धावा आणि २५० विकेट्सचा टप्पाही पूर्ण करेल. जडेजाने मोहालीत पहिल्या डावात १७५ धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत त्याने पहिल्या डावात ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, दुसऱ्या डावात ४६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे जडेजाने आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कसोटी अष्टपैलू खेळाडू म्हणून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ एका बदलासह मैदानावर उतरू शकतो. संघ जयंत यादवऐवजी अक्षर पटेलला संधी देऊ शकते. अक्षरचा फिटनेस अहवालानंतर कुलदीप यादवच्या जागी थेट संघात समावेश करण्यात आला आहे. भारतातील अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या शेवटच्या कसोटीत अक्षरला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने ११ विकेट्स घेतल्या होत्या. आता या दिवस-रात्र कसोटी सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अफलातून! पाकिस्तानी महिला विकेटकीपरचा ‘अद्भूत’ झेल; चाहत्यांंना आली थेट ‘माही’च्या ‘त्या’ कॅचची आठवण

दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी

दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---