भारताचा क्रिकेट संंघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात येत्या आठवड्यात मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. मात्र मैदानावर क्रिकेटपटूंनी प्रवेश करण्यापुर्वीच कोविड-१९ महामारीचे सावट पसरले आहे. इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यानंतर यजमानांच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे वनडे आणि टी२० मालिकेचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. मात्र आता श्रीलंकेतून एक आनंदाची बातमी आली आहे.
इंग्लंडवरुन परतलेल्या श्रीलंकेच्या सर्व क्रिकेटपटूंचा कोरोना अहवाल पुढे आला आहे. कुशल परेरा, दुष्मंत चमीरा, धनंजय डी सिल्वा यांच्यासह संघातील सर्व क्रिकेटपटूंचा कोरोना अहवाल निगोटिव्ह आढळला आहे. यामुळे श्रीलंकेच्या गोटात आनंदाची लहर पसरली आहे. तसेच आता भारताविरुद्ध श्रीलंकेचा मुख्य संघ मैदानात उतरण्याची शक्यता वाढली आहे.
इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह
श्रीलंकेचा संघ इंग्लंडमध्ये असताना तीन क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफमधील तब्बल ७ सदस्यांसह इंग्लंड संघातील एकूण ९ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. यामुळे इंग्लंडसह पाहुण्या श्रीलंकेचीही चिंता वाढली होती. इंग्लंडचा दौरा संपल्यानंतर मायदेशी परतल्यावर श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर डाटा विश्लेषक जीटी निरोशन हेसुद्धा पॉझिटिव्ह निघाले होते.
जैव सुरक्षित वातावरणात दिला जाईल प्रवेश
परंतु आता श्रीलंका संघातील क्रिकेटपटूंचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता या सर्व क्रिकेटपटूंना एका आठवड्याच्या कडक विलगीकरणानंतर सोमवारी (१२ जुलै) जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. येथे क्रिकेटपटूंना एकमेकांच्या खोलीत जाऊन एकत्र वेळ घालवण्याची परवानगी मिळेल. सोबतच त्यांना स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम वापरण्याचीही मुभा असेल. पुढे ४८ तासांनंतर म्हणजेच २ दिवसांच्या अवधीनंतर त्यांना नेटमध्ये जाऊन सरावही करता येईल.
वेगवेगळ्या स्टेडियममध्ये करतील सराव
महत्त्वाचे म्हणजे, जरी श्रीलंकेचे सर्व क्रिकेटपटू कोरोना निगेटिव्ह आले असतील; तरीही त्यांना वेगळ्या मैदानावर सरावासाठी पाठवले जाईल. श्रीलंका संघ आर प्रेमदासा स्टेडियमवर सराव करेल. तर पाहुणा भारतीय संघ आधीच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (एसएससी) स्टेडियम, कोलंबो येथेच सराव चालू ठेवेल. १८ जुलै रोजी वनडे सामन्याने भारताचा श्रीलंका दौरा सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन स्वयंपाक घरात आजमावतोय हात, पाहा व्हिडिओ