भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत संघ निवडीसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. यानंतर प्रशिक्षक आणि त्यांचा नवा कोचिंग स्टाफ भारतीय संघासह श्रीलंकेला रवाना झाला. टीम इंडियाचा पहिला सामना 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध सुरु होणार आहे. हा सामना कुठे टेलिकास्ट होणार याबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या बातमीद्वारे आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत.
श्रीलंका आणि भारत यांच्यात 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. हे सामने ‘जिओ सिनेमा’ किंवा ‘हॉटस्टार’वर प्रसारित होणार नाहीत. या दोन्ही मालिका ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वर प्रसारित होणार आहेत. हे सामने इंग्रजी कॉमेन्ट्रीसह SONY TEN 5 वर आणि हिंदीमध्ये SONY TEN 3 वर प्रसारित केले जातील. सर्व सामने SONY LIV ॲप आणि वेबसाइटवर देखील थेट प्रक्षेपित केले जातील. याशिवाय हे सर्व सामने ‘डीडी स्पोर्ट्सवर’ही पाहता येणार आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेची सुरुवात 27 आणि 28 जुलै रोजी होणाऱ्या सलग दोन सामन्यांनी होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 2 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी आणि दुसरा सामना 4 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. त्यानंतर शेवटचा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
टी20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज