भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये येत्या काही दिवसात मर्यादित षटकांच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी, श्रीलंका संघाला विश्वविजेता बनवणारे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी या मालिकेबद्दल भाष्य करत नवा वाद छेडला होता. परंतु आता श्रीलंका क्रिकेट बोर्डने याबाबत आपले मत मांडले आहे.
अर्जुन रणतुंगा यांनी केलेल्या वक्तव्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्ड सहमत नसल्याचे दिसून आले. शिखर धवन आणि संघाला द्वितीय श्रेणीचा संघ संबोधणाऱ्या रणतुंगा यांना त्यांच्याच बोर्डाने फटकारले आहे. त्यांनी श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या युवा भारतीय संघाला अनुभवी संघ असल्याचे म्हटले आहे.
बोर्डाने म्हटले की, “भारतीय संघातील २० सदस्यांपैकी १४ सदस्य कुठल्या-ना-कुठल्या प्रकारातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. हा द्वितीय श्रेणीचा संघ नाही, जसे की म्हटले जात आहे.”
अर्जुन रणतुंगा यांनी केलेल्या वक्तव्यावरून पेटला वाद
दोन वर्षे श्रीलंकेच्या राजकारणात कार्यरत असणाऱ्या अर्जुन रणतुंगा यांनी पत्रकारांना म्हटले होते की, “हा दुसऱ्या श्रेणीचा भारतीय संघ आहे आणि त्यांचे इथे येणे आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. टेलिव्हिजन मार्केटिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्यासोबत खेळण्याचे मान्य केल्याबद्दल मी सध्याच्या प्रशासनाला दोष देतो.”
श्रीलंकन संघ कमकुवत
श्रीलंकन संघाला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. गेल्या एक वर्षात श्रीलंका संघाने तीनही प्रकारात एकूण २२ सामने खेळले आहेत. यात त्यांना अवघ्या ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर १६ सामन्यांमध्ये श्रीलंकन संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारतीय संघाची सरावास सुरुवात
भारतीय संघाने ३ दिवसांचा विलगिकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यानंतर शुक्रवारी(२ जुलै) भारतीय संघातील खेळाडू सराव करण्यासाठी मैदान उतरले आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारच्या हाती देण्यात आले आहे. (Ind vs sl srilanka cricket board reaction on arjuna ranatunga statement over team india)
महत्वाच्या बातम्या-
दहाव्या नंबरवर फलंदाजीला येत एकट्याच्या जीवावर भारताला दिवसा चांदणे दाखवणारा अवलिया क्रिकेटर
Wimbledon 2021: सानिया-बोपन्नाने नोंदवला ऐतिहासिक विजय, ५३ वर्षांत पहिल्यांदाच झालं असं
मराठीत माहिती- क्रिकेटर हरभजन सिंग