टी20 मालिकेत भारताने श्रीलंकेचा पराभव केला. यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची द्विपक्षीय वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच (2 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. तत्तपूर्वी पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ अस्लंकाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय संघ पहिल्या डावात गोलंदाजी करताना पहायला मिळणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह भारतीय संघ आठ माहिन्यानंतर वनडे सामना खेळण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने शेवटचा एकदिवसीय सामना 21 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. त्यानंतर टीम इंडिया आजच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका: चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला धनंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज
वास्तविक, वनडे मालिकेत भारताला श्रीलंकेकडून आणखी आव्हानाची अपेक्षा आहे. 2014 पासून, भारताने 25 पैकी 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचा पराभव केला आहे. श्रीलंकेला केवळ चार एकदिवसीय सामने जिंकता आले आहेत. टी20 मालिकेतही श्रीलंकेची कामगिरी अत्यंत खराब होती. मालिकेतील पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात विजयाच्या अगदी जवळ येऊनही संघाला पराभव पत्करावा लागला. आता श्रीलंकेला भारताला आव्हान द्यायचे असेल तर दमदार कामगिरी करावी लागेल. टीम इंडियामध्ये अनेक प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने संघ पूर्वीपेक्षा मजबूत दिसत आहे. हेही तितकचं खरं आहे.
हेही वाचा-
IND VS SL: पहिल्या सामन्यात यजमान संघानं जिंकला टाॅस, जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग 11
श्रीलंकेच्या कॅम्पमध्ये पसरली भीतीची लाट! टीम इंडिया आठ महिन्यानंतर वनडे सामन्यासाठी मैदानात उतरणार
कोलंबोमध्ये येणार ‘विराट’वादळ; कोहलीची या स्टेडियममधील आकडेवारी जाणून व्हाल थक्क!