---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार का अश्विन? उपकर्णधाराने दिली महत्त्वाची माहिती

r-ashwin-jadeja
---Advertisement---

नुकत्याचा खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेला क्लीन स्वीप (३-०) दिला. आता चार मार्चपासून उभय संघातील कसोटी मालिका (India vs Sri Lanka Test Series) खेळली जाणार आहे. पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला जाणार असून, त्याआधी चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. रविचंद्रन अश्विनच्या फिटनेसविषयी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने ही माहिती दिली आहे. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन करण्याची शक्यता सांगितली जात आहे.

अश्विनने त्याचा शेवटचा सामना दक्षिण अफ्रिका दौऱ्यात खेळला होता. दक्षिण अफ्रिकेसोबतच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये त्याचा सहभाग होता. असे असले तरी, नंतर तो दुखापतग्रस्त झाला. याच पार्श्वभूमीवर त्याला वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये विश्रांती दिली गेली होती. परंतु आता तो फिट असल्याची माहिती मिळत आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुनरागमन देखील करू शकतो.

सराव सत्रात फिट दिसत होता अश्विन – बुमराह

कसोटी मालिकेपूर्वी १ मार्च घेतलेल्या वर्चुअल पत्रकार परिषदेत संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने अश्विनच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती दिली. तो म्हणाला की, “अश्विन ठीक होत आहे. काहीच अडचण दिसत नाहीय. तो चांगला दिसत आहे आणि आज सरावात सर्वकाही केले. तो चांगल्या प्रकारे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत आहे. आशा आहे की, जास्त काही अडचण येणार नाही.”

अश्विन नाही, तर मग कोण ?

कसोटी मालिकेसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात अश्विनव्यतिरिक्त इतर सर्व खेळाडू सध्या फिट आहेत. अशात अनुभवी कसोटी खेळाडू रविचंद्रन अश्विन पहिल्या कसोटीपूर्वी फिट झाला नाही, तर जयंत यादवला संधी मिळू शकते. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि जयंत यादव मिळून विरोधी संघाच्या अडचणी वाढवतील. यापूर्वी न्याझीलंडविरुद्ध मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात जयंत यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या –

आर्यन पम्प्स एमएसएलटीए १५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत स्मृती भसीनचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स व टायगर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

Video: पोलार्ड झाला फिरकीपटू! त्रिनिदाद टी१० स्पर्धेत यष्टीरक्षक फलंजादाला अडकवले फिरकीच्या जाळ्यात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---