भारत आणि श्रीलंका संघ बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमने सामने आहेत. उभय संघातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना १२ मार्चपासून या स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे आणि संघ भक्कम स्थितीत आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने कमाल फलंदाजी केली आणि सर्वांना त्याचे कौतुक करण्यास भाग पाडले आहे. पंतने अवघ्या २८ चेंडूत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले.
रिषभ पंत (Rishabh Pant) याने या कसोटी सामन्यात एकदिवसीय सामन्याप्रमाणे गोलंदाजांची धुलाई केली. त्याने अवघ्या २८ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या, यामध्ये त्याच्या ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या अर्धशतकासह त्याने माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आणि भारतासाठी सर्वात कमी चेंडूत कसोटी अर्धशतक करणारा फलंदाज बनला आहे. कपिल देव यांनी १९८२ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. सामन्याच्या पहिल्या डावातही पंतने ३९ धावांचे महत्वाचे योगदान दिले होते.
पंतच्या या जबरदस्त फलंदाजी प्रदर्शनानंतर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा आहे. भारतीय संघाच्या अनेक माजी दिग्गजांसह सध्या खेळणाऱ्या खेळाडूंनीही पंतचे कौतुक केले आहे. पंतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडला आहे.
भारतीय दिग्गजांनी केले पंतचे कौतुक
Well played @RishabhPant17 🇮🇳🚀🙌 pic.twitter.com/GvgDXVFymg
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 13, 2022
The frequency with which @RishabhPant17 produces such knocks is just incredible. Usually if a batter is mercurial he's not consistent. But in Pant we've a mercurial batter who's consistent. World beater! #INDvSL pic.twitter.com/qse2dY0zOz
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 13, 2022
Fastest 50 by an Indian test match history. Well played Rishabh pant 👏
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 13, 2022
Hum iss ladke ko jaante hain 😁 #RishabhPant #INDvsSL
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) March 13, 2022
चाहत्यांनी पाडला मिम्सचा पाऊस
https://twitter.com/FansRishabhPant/status/1502990877501042688?s=20&t=qtke8wFPcI566NOjKLwrXg
Fastest 50 for India in test by #RishabhPant pic.twitter.com/sm3zGXoH8Q
— Aman_Chain 🇮🇳 (@Amanprabhat9) March 13, 2022
Rishabh Pant about T20 and Test Cricket: pic.twitter.com/nPGEsjdREz
— Rario (@rariohq) March 13, 2022
https://twitter.com/kingashu1008/status/1502977780535169025?s=20&t=VKs3pceP_9zWsl0sJNODbg
https://twitter.com/smileandraja/status/1502982554265296898?s=20&t=SRPlYr1k_XBQJF3wa9fVkg
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये भारतीय संघाने त्यांचे दोन्ही डाव खेळून काढले. पहिल्या दिवशी भारतीय संघ २५२ धावा करून सर्वबाद झाला. त्यानंतर श्रीलंका संघाला फलंदाजीची संधी मिळाली आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने ६ विकेट्सच्या नुकसानावर ८६ धावा केल्या.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी लवकरच श्रीलंका संघ १०९ धावा करून सर्वबाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३०३ धावा करून डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका संघाने एक विकेट गमावली आहे आणि २८ धावाही केल्या आहेत. विजयासाठी श्रीलंकेला अजून ४१९ धावांची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या –
मार्च १४, २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!
पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे इंग्लिश गोलंदाज, बुमराहचा असेल बॉलिंग पार्टनर
केवळ कपिल देवच नाही तर वेगवान अर्धशतकामुळे धोनीवरही वरचढ ठरलाय पंत, १६ वर्षांच्या विक्रमाला तडा