---Advertisement---

IND vs SL: गॉल कसोटीत चमकले भारताचे हे 5 हिरो! दोन युवा खेळाडूंची दमदार कामगिरी

On: बुधवार, ऑगस्ट 19, 2026 10:32 PM
---Advertisement---

IND vs SL: गॉलच्या मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) पहिला कसोटी सामना खेळला गेला असून, या सामन्यात टीम इंडियाने (Team india) गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली. त्यामुळेच अखेरीस टीम इंडियाने हा सामना 165 धावांनी जिंकला. या विजयात भारताच्या 5 स्टार खेळाडूंचा मोलाचा वाटा होता, त्यापैकी 2 युवा खेळाडूंनी सर्वात जास्त प्रभावित केले. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे श्रीलंकेचा संघ सामन्यात कुठेही टिकू शकला नाही.

देवदत्त पडिक्कल: या सामन्यात स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कलने (Devdatta paddikal) अतिशय अप्रतिम खेळ केला. पहिल्या डावात शानदार 167 धावांची खेळी केल्यानंतर, दुसऱ्या डावातही त्याने महत्त्वपूर्ण 44 धावा केल्या. या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्याला ‘सामनावीर’ (प्लेअर ऑफ द मॅच) म्हणून निवडण्यात आले.

मानव सुथार: युवा फिरकी अष्टपैलू खेळाडू मानव सुथारने (Manav Suthar) पहिल्या डावात 24 धावा केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये त्याने 6 विकेट्स घेत मोठ्या सामन्यात स्वतःला सिद्ध करून दाखवले. त्यामुळे आता प्रत्येक दिग्गज क्रिकेटपटूकडून त्याचं कौतुक होत आहे.

केएल राहुल: सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) पहिल्या डावात धडाकेबाज फलंदाजी करत 82 धावा केल्या. एवढंच नाही तर, दुसऱ्या डावातही राहुलने 35 धावांची भर घातली. फलंदाजीसाठी कठीण असलेल्या या खेळपट्टीवर राहुलने संघासाठी अतिशय महत्त्वाच्या खेळी खेळल्या.

रवींद्र जडेजा: फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) फलंदाजीत फारसं योगदान दिलं नाही, पण गोलंदाजीत त्याने 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे टीम इंडियाने सामना आपल्या नावावर केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---