IND vs SL, 1st T20 :- कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरद्धचा पहिला टी20 सामना 43 धावांच्या फरकाने जिंकला. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने झंझावाती खेळी केली. मात्र या सामन्यात पंत नेहमीच्या क्रमांकावर फलंदाजीला न येता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवले होते. आता पंतचा मित्र अक्षर पटेल याने संघाने हा निर्णय का घेतला? याचा खुलासा केला आहे.
शनिवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पंतच्या जागी सूर्यकुमार यादव क्रमांक 3 वर फलंदाजीला आला होता. विराट कोहली संघात असताना तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. कोहलीने टी20 विश्वचषकात सलामीची जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्या जागी पंतला पाठवण्यात आले. पंतने या क्रमांकावर चांगली कामगिरी केली होती. मात्र, श्रीलंका दौऱ्यात डावे-उजवे संयोजन राखण्यासाठी पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले.
गोलंदाजांसाठी ते अवघड बनते
याबाबत बोलताना भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल म्हणाला की, संघात चार डावखुरे फलंदाज आणि चार उजव्या हाताचे फलंदाज आहेत आणि त्यामुळेच उजव्या-डाव्या जोडीला राखण्यासाठी पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. अक्षर म्हणाला, “आमच्या संघात चार डावखुरे आणि चार उजव्या हाताचे फलंदाज आहेत. जर क्रीजवर डाव्या-उजव्या हाताचे फलंदाज असतील तर गोलंदाजांना लाईन-लेंथ राखणे फार कठीण होऊन बसते. आता संघात चार डावखुरे आहेत, तर तुम्ही त्यांचा कसा वापर कराल? अशावेळी तुम्हाला एकाच वेळी दोन डावखुरे न पाठवण्याची किंवा दोन उजव्या खेळाडूंना एकाच वेळी उतरवले नाही, तर योग्य ठरेल.”
तो पुढे म्हणाला, “जर तुमच्याकडे अशा संधी असतील तर तुम्ही त्यांचा वापर करायला हवा. विरोधी संघाच्या गोलंदाजीचे पर्याय लक्षात घेऊन तुम्ही फलंदाजी क्रमात सतत बदल करायला हवे.”
हेही वाचा –
शाब्बास मनू! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलं पहिलं मेडल; नेमबाजीत कांस्य पदकावर निशाणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा वाढली! रमिता जिंदाल फायनलमध्ये दाखल
पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना दिले प्रोत्साहन, ‘मन की बात’मध्ये पॅरिस ऑलिम्पिकचा उल्लेख