पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी (28 जुलै) शूटिंगमधून भारतासाठी आनंदाची बातमी आहे. रमिता जिंदालनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत रमिता एकूण 631.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. रमितानं पहिल्या सिरीजमध्ये 104.3, दुसऱ्यामध्ये 106.0, तिसऱ्यामध्ये 104.9, चौथ्यामध्ये 105.3, पाचव्यामध्ये 105.3 आणि सहाव्या सिरीजमध्ये 105.7 गुण मिळवले. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या (29 जुलै) होणार आहे.
एलावेलिन वालारिवान देखील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेत होती. परंतु तिनं निराश केलं. वालारिवान 630.7 गुणांसह 10व्या स्थानावर राहिली. तिची एका क्षणी अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू होती, मात्र तिला शेवटच्या काही शॉट्समध्ये आपला वेग कायम राखता आला नाही. आठ खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, त्यापैकी तीन मेडल जिंकतील.
रमिता जिंदाल आणि इलावेलिन वालारिवन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भाग घेतला होता, जिथे त्यांची कामगिरी चांगली नव्हती. रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबौता यांनी एकूण 628.7 गुणांसह सहावं, तर इलावेनिल वालारिवन आणि संदीप सिंग यांनी 626.3 गुणांसह 12वं स्थान पटकावलं.
हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील रमिता ही अकाउंट्सची विद्यार्थिनी आहे. रमिताचे वडील अरविंद जिंदाल हे टॅक्स सल्लागार आहेत. 2016 मध्ये रमिताला तिचे वडील शूटिंग रेंजमध्ये घेऊन गेले होते. यानंतर रमिताचा या खेळाकडे कल वाढला. 20 वर्षीय रमितानं 2022 मध्ये ज्युनियर ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर तिनं हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही दोन पदकं जिंकली.
हेही वाचा –
अवघ्या 29 मिनिटांत काम तमाम! पीव्ही सिंधूच्या ऑलिम्पिक मोहिमेला धडाक्यात सुरुवात
Paris Olympic 2024: 24 कोटी लोक, फक्त 7 खेळाडू…’, लाइव्ह टीव्हीवर पाकिस्तानचा ‘अपमान’
पॅरिस ऑलिम्पिक : टेबल टेनिसमध्ये भारताचा दबदबा, बॅडमिंटनमध्येही शानदार कामगिरी