दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकमधील आपला पहिला सामना सहज जिंकला आहे. तिनं ग्रुप स्टेजमध्ये मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रझाकचा सरळ सेटमध्ये अवघ्या 29 मिनिटांत पराभव केला.
सिंधूनं मालदीवच्या खेळाडूला सामन्यात कोणतीही संधी दिली नाही. तिनं पहिला सेट 21-9 अशा फरकानं जिंकला. यानंतर दुसरा सेट 21-6 असा जिंकला. पीव्ही सिंधूनं 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकं जिंकलं आहे. आता या स्टार खेळाडूकडून पदकाच्या हॅट्ट्रिकची अपेक्षा आहे.
पीव्ही सिंधू आणि मालदीवची फातिमथ नब्बा अब्दुल रज्जाक यांच्यातील सामना एकतर्फी मानला जात होता आणि तसंच झालं. सिंधूनं पहिला गुण मिळवून सामन्याला सुरुवात केली. यानंतर हळूहळू गुणांमधील फरक वाढत गेला. सिंधूने पहिला गेम 21-9 अशा मोठ्या फरकाने गेम सहज जिंकला.
पहिला गेम सहज जिंकल्यानंतर सिंधूनं दुसऱ्या गेममध्येही आघाडी घेण्यास सुरुवात केली. सिंधूनं आक्रमकता दाखवत स्कोअर लाइन 10-3 अशी करत मोठी आघाडी घेतली. दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेतीनं दुसरा गेम 21-6 अशा फरकाने जिंकून आपल्या मोहिमेला धडाक्यात सुरुवात केली.
आता सिंधूसमोर 31 जुलै रोजी दुसऱ्या गट सामन्यात इस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबाचीचं आव्हान असेल. ती मॅच जिंकली तर सिंधू प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल. 29 वर्षीय सिंधू गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाही, परंतु तिनं सांगितलं की प्रकाश पदुकोणसोबत गेल्या आठ महिने सराव केल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आहे आणि ती सलग तिसरं ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी सज्ज आहे.
हेही वाचा –
चेहऱ्यावर बॉल लागला, रक्त निघालं, तरीही हार मानली नाही; या भारतीय गोलंदाजाच्या धैर्याला तोड नाही!
पॅरिस ऑलिम्पिक : चिराग-सात्विकनं पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
पॅरिस ऑलिम्पिक : हाॅकीमध्येही भारताची शानदार कामगिरी, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव