टीम इंडियात हार्दिकची कमी भरून काढणाऱ्या ‘त्या’ दोघांवर फलंदाजी प्रशिक्षकांनी उधळली स्तुतीसुमने; म्हणाले…

टीम इंडियात हार्दिकची कमी भरून काढणाऱ्या 'त्या' दोघांवर फलंदाजी प्रशिक्षकांनी उधळली स्तुतीसुमने; म्हणाले...

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या विश्रांतीवर आहे. त्यामुळे तो सध्या स्वतःच्या फिटनेस आणि फॉर्मवर काम करत आहेत. त्याच्या अनुपस्थिती संघाला एका चांगल्या अष्टपैलू आवश्यकता निर्माण झाली होती, जी भूमिका दीपक चाहर (Deepak Chahar) आणि शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) या दोघांनी गेल्या काही दिवसात चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. भारताचे हे दोन्ही वेगवान गोलंदाज अलिकडच्या काळात चांगली फलंदाजीही करताना दिसेल आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक राठोड म्हणाले की, “दोन्हीही खेळाडू चांगली फलंदाजी करत आहेत, यामागचे कारण हे आहे की, दोघेही खरोखर त्यांच्या फलंदाजीवर खूप मेहनत करत आहेत. आत्ताच नाही, तर मागच्या काही वर्षांपासून ते स्वतःच्या फलंदाजीवर मेहनत आणि सराव करत आहेत. त्याचा परिणाम तुम्ही सध्या पाहू शकता. संघात दोन अष्टपैलू असणे खरोखर चांगली गोष्ट आहे.”

वेस्ट इंडीजविरुद्ध नुकतीच एकदिवसीय मालिका खेळली गेली. मालिकेत भारतीय संघाच्या मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि रिषभ पंत या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद होऊनही मध्यक्रमतील या खेळाडूंनी डाव सांभाळला होता.

या संदर्भात बोलताना राठोड म्हणाले की, “अहमदाबादमध्ये आम्ही एकदिवसीय मालिका खेळली. त्याठिकाणी खेळपट्टी थोडी आव्हानात्मक होती. खेळाडूंनी सुरुवातीच्या विकेट्स गमावल्यानंतर संघाला पुढे जाताना पाहणे चांगली गोष्ट होती. आम्ही मोठी धावसंख्या करू शकतो आणि मालिका जिंकलो. संघातील सूर्यकुमार, श्रेयस, पंत यांसारख्या खेळाडूंनी मध्य फळीत फलंदाजीला येऊन चांगली धावसंख्या उभारली.”

पुढे बोलताना राठोड म्हणाले की, “जेव्हा फलंदाज फॉर्ममध्ये असतात, तेव्हा संघासाठी हो गोष्ट फायदेशीर असते. फलंदाज जेवढा चांगल्या फॉर्ममध्ये असतो, संघासाठी तेवढीचा चांगली गोष्ट असते. मला माझ्या मध्यक्रमातील फलंदाजांविषयी कधीच चिंता वाटली नाही. अलिकडच्या काळातील आमच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकांमध्ये मध्यक्रमातील खेळाडू चांगले प्रदर्शन करत आहेत.”

दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने ३-० असा मोठा विजय मिळवाल होता. उभय संघात १६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहेत. टी-२० मालिकेतील सामने  १६, १८, २० फेब्रुारीला खेळले जातील.

महत्वाच्या बातम्या –

राजस्थान रॉयल्सने भारतीय खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर जोफ्रा आर्चरला सोडले, कारण घ्या जाणून

Video: फलंदाज क्रिजपासून लांब असतानाही विकेटकीपरने केले नाही रनआऊट, कारण ऐकून नक्कीच कराल कौतुक

रैनासह ‘या’ ४ भारतीयांना मेगा लिलावात नाही मिळाला खरेदीदार, आता आयपीएल करियरवर लागणार कायमचा ब्रेक!

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.