भारतीय संघ डब्ल्यूटीसी अंतिम सामना गमावल्यानंतर जवळपास एक महिना विश्रांती घेणार आहे. मात्र, त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला यजमानांसोबत 2 कसोटी, 3 वनडे आणि तब्बल 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अशातच भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सामना लाईव्ह पाहण्यासाठी एका प्लॅटफॉर्मने घोषणा केली आहे की, हे सर्व सामने मोफत लाईव्ह स्ट्रीम करणार आहेत.
कुठे पाहता येणार लाईव्ह स्ट्रीमिंग?
भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. आयपीएलमध्ये व्ह्युअरशिपचे सर्व विक्रम मोडल्यानंतर आता जिओ सिनेमा (Jio Cinema) आणखी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात होणाऱ्या सर्व सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा मोफत करणार आहे. याची घोषणा स्वत: जिओ सिनेमाने ट्वीट करत केली आहे. (ind vs wi 2023 big news jio cinema will stream free live action betweeen india vs west indies matches)
प्रत्येकजण पाहू शकतो मोफत सामना
जिओ सिनेमाने ट्वीट करत याची माहिती दिली आहे की, जिओ सिमव्यतिरिक्त दुसऱ्या कंपनीचे युजर्सही मोफत हा प्रत्येक सामने पाह शकतील. ट्वीट करत जिओ सिनेमाने लिहिले की, “एक परफेक्ट कॅरिबियन हॉलिडे! आपल्या तारखा लक्षात ठेवा आणि तयार व्हा भारत आणि वेस्ट इंडिज संघात होणाऱ्या लाईव्ह ऍक्शनसाठी. (कोणत्याही सिमवर मोफत.)”
????️,☀️ & ???? – A perfect Caribbean holiday!
Mark your ????️ and tune in for LIVE action from India’s tour of West Indies on #JioCinema (free on any sim card).#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/gmObCF55hA
— JioCinema (@JioCinema) June 15, 2023
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 2023
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत कसोटी मालिका
12-16 जुलै- पहिला कसोटी सामना, डोमिनिका
20-24 जुलै- दुसरा कसोटी सामना, त्रिनिदाद
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत वनडे मालिका
27 जुलै- पहिला वनडे सामना, बार्बाडोस
29 डुलै- दुसरा वनडे सामना, बार्बाडोस
1 ऑगस्ट- तिसरा वनडे सामना, त्रिनिदाद
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत टी-20 मालिका
3 ऑगस्ट- पहिला टी-20 सामना, त्रिनिदाद
6 ऑगस्ट- दुसरा टी-20 सामना, गयाना
8 ऑगस्ट- तिसरा टी-20 सामना, गयाना
12 ऑगस्ट- चौथा टी-20 सामना, प्लोरिडा
13 ऑगस्ट- पाचवा टी-20 सामना, फ्लोरिडा
महत्वाच्या बातम्या-
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यास वृद्धिमान साहाचा स्पष्ट नकार, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
अंबाती रायुडूचा खळबळजनक खुलासा! BCCIवर गंभीर आरोप करत फोडलं 2019 वर्ल्डकपचं भांडं