---Advertisement---

उद्ध्वस्त होत असलेल्या विंडीजला वाचवण्यासाठी धावून आला ब्रायन लारा, भारताविरुद्धच्या मालिकेत मोठी जबाबदारी

Brian-Lara
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता वेस्ट इंडिजला मायदेशात भारताविरुद्ध दोन हात करायचे आहेत. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने 12 जुलैपासून होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात कसोटीव्यतिरिक्त 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. विश्वचषक क्वालिफायरमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर वेस्ट इंडिज संघासाठी माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा धावून आला आहे.

ब्रायन लारा परफॉर्मन्स मेंटॉर (प्रदर्शन मार्गदर्शक) (Brian Lara Performance Mentor) म्हणून संघाशी जोडला गेला आहे. मागील काही दिवसांबद्दल बोलायचं झालं, तर वेस्ट इंडिज (West Indies) संघाने लौकिकाला साजेशी कामगिरी केली नाहीये. त्यांनी अत्यंत लाजीरवाणे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, दोन वेळचा चॅम्पियन असलेला वेस्ट इंडिज संघ 48 वर्षांमध्ये पहिल्यांदाच वनडे विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धेचा भाग नसेल.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना मार्गदर्शन देणार लारा
ब्रायन लारा (Brian Lara) 90च्या दशकातील दिग्गज फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याने 1990 ते 2007 यादरम्यान वेस्ट इंडिज संघाकडून 131 कसोटी सामने आणि 299 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 52.88च्या सरासरीने 11953 धावा केल्या आहेत. कसोटीत नाबाद 400 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. त्यात त्याने 34 शतके आणि 48 अर्धशतकेही झळकावली आहेत. याव्यतिरिक्त वनडेत त्याने 40.48च्या सरासरीने 10405 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 19 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे.

अशात लारा सध्याच्या वेस्ट इंडिज संघासोबत जोडल्यामुळे निश्चितच मोठा आधार मिळेल. लारा आता उद्ध्वस्त होत असलेल्या वेस्ट इंडिज संघाला संजीवनी देण्याचा प्रयत्न करेल.

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघाचे वेळापत्र
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून खेळला जाईल. तसेच, दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून सुरू होईल. कसोटी मालिकेनंतर उभय संघात 27 जुलैपासून वनडे मालिका खेळली जाईल. दुसरा वनडे सामना 29 जुलै आणि तिसरा वनडे सामना 1 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.

कसोटी आणि वनडे मालिकेनंतर उभय संघात टी20 मालिका खेळली जाईल. टी20त वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी, दुसरा सामना 6 ऑगस्ट रोजी, तिसरा सामना 8 ऑगस्ट, चौथा सामना 12 ऑगस्ट आणि दौऱ्याचा पाचवा आणि अखेरचा टी20 सामना 13 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. (ind vs wi former cricketer brian lara joins west Indies team as performance mentor)

महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पुरुषांच्या इमर्जिंग Asia Cup 2023साठी भारतीय संघाची निवड, नेतृत्वाची धुरा ‘या’ पठ्ठ्याकडे
बिग ब्रेकिंग! इंग्लंडचा हुकमी एक्का ऍशेस 2023मधून बाहेर, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---