भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी डॉमिनिका येथे रवाना झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात येत्या 12 जुलैपासून विंडसर पार्क स्टेडिअममध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 स्पर्धेच्या सायकलमधील भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे भारतीय संघ ही मालिका जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ 1 जुलै रोजी बार्बाडोस येथे पोहोचला होता. यादरम्यान भारतीय संघाने जोरदार सराव केला. तसेच, संघ आता सामन्याचे ठिकाण असलेल्या डॉमिनिका (Dominica) कसोटीसाठी रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे फोटो बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत विराट कोहली, रोहित शर्मा, ईशान किशन, यशस्वी जयसवाल आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह इतर खेळाडू काळ्या रंगाच्या ट्रेनिंग जर्सीमध्ये दिसत आहेत.
???? ???? When we went Jet, Set & Go to Dominica ✈️#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/1lMi2a9Dza
— BCCI (@BCCI) July 8, 2023
मालिकेचे वेळापत्रक
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात आधी कसोटी मालिका खेळली जाईल. यामध्ये 2 सामन्यांचा समावेश आहे. पहिला सामना 12 जुलैपासून सुरू होईल. तसेच, दुसरा सामना 20 जुलैपासून खेळला जाईल. कसोटी सामन्यांची सुरुवात भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता होईल. कसोटी मालिका संपताच दोन्ही संघ 27 जुलैपासून वनडे मालिकेत आमने-सामने येतील. या मालिकेतील पहिला सामना 27 रोजी, दुसरा सामना 29 जुलै रोजी आणि अखेरचा वनडे सामना 1 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
यानंतर उभय संघात 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होईल. मालिकेतील दुसरा टी20 सामना 6 ऑगस्ट, तिसरा सामना 8 ऑगस्ट, चौथा सामना 12 ऑगस्ट आणि पाचवा सामना 13 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. (ind vs wi indian cricket team travel to dominica for first test see photos)
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक 2023मध्ये खेळणार की नाही पंत? समोर आलेली अपडेट खूपच महत्त्वाची
ऐतिहासिक! बांगलादेशला चारीमुंड्या चीत करत वनडे मालिका अफगाणिस्तानच्या खिशात, आठ वर्षानंतर बांगलादेशवर नामुष्की