काही काळापूर्वी भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाज-अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या (Hardik pandya) हा एकमेव पर्याय होता आणि त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संघात आपले स्थान पक्के केले होते. मागील काही महिन्यांपासून त्याचे संघातील स्थान संकटात येताना दिसत आहे. काही काळापासून तो दुखापतीमूळे संघातून बाहेर आहे. टी२० विश्वचषक २०२१ मध्ये हार्दिक फलंदाजीत अपयशी ठरला आणि गोलंदाज म्हणून फारसे योगदान देऊ शकला नाही. आता भारतीय संघाला वाटते की, व्यंकटेश अय्यर(venkatesh Iyer) टी२० फॉरमॅटसाठी हार्दिकचा योग्य पर्याय आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत व्यंकटेशने चांगली कामगिरी केली आणि दाखवून दिले की, संघ व्यवस्थापनाकडे फिनिशर आणि सहाव्या स्थानावरील गोलंदाजीसाठी तो चांगला पर्याय असू शकतो. व्यंकटेशने संपूर्ण मालिकेत उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजी केली. त्यामुळे हार्दिक पांड्याबद्दलचे अनेक मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Hardik Pandya after seeing #venkateshiyer performance pic.twitter.com/sdTZR5dY1b
— ABHISHEK-45 (@legend_bhaiya1) February 20, 2022
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठीही हार्दिकचे संघात पुनरागमन झालेले नाही. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे की, हार्दिक जर सामन्यांसाठी तंदुरुस्त असेल आणि गोलंदाजीसाठीही फिट असेल तरच त्याचे संघात पुनरागमन होऊ शकते. हार्दिकला आयपीएल २०२२ मध्ये गुजरात संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. आता तो आयपीएलमध्ये कशी कामागिरी करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Hardik pandya watching Ventakesh Iyer taking wickets and making runs for the team #INDvsWI pic.twitter.com/ITgepRlMgx
— Vivek Gautam (@Imvivek04) February 20, 2022
We Got A Replacement For Hardik Pandya Finally Venkatesh Iyer Is Proving His Worth Worldcup Winning Possibility Slowly Raising 🥵
Currently,#INDvsWI #venkateshiyer pic.twitter.com/ZZoSV1hXEC
— RR™ (@Loyal_Rohitian) February 20, 2022
व्यंकटेशने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ९२ च्या सरासरीने आणि १८४ च्या स्ट्राइक रेटने ९२ धावा केल्या. फलंदाजीत त्याने डावाच्या शेवटी चांगली खेळी केली आबे. त्याने शेवटच्या टी२० सामन्यात सुर्यकुमार यादवसोबत मोठी धावसंख्या उभारली होती. याशिवाय त्याने तीन सामन्यांमध्ये एकूण ३.१ षटके टाकली आणि या काळात दोन विकेट्सही घेतल्या. व्यकटेश अय्यर २०२२ च्या टी२० विश्वचषकासाठी संघात आपले स्थान निश्चित करु शकतो आणि तसे झाले तर, हार्दिकसाठी भारतीय संघात पून्हा स्थान मिळवणे खूप कठीण होईल.
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची टी२० मालिका ३-० ने जिंकली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला १७ धावांनी पराभूत केले. आता भारत श्रीलंका संघाविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महागुरू द्रविडने कमी केला होता पदार्पणवीर आवेश खानवरचा दबाव, दिला होता ‘हा’ झक्कास मंत्र
पूरनच्या फॉर्मने हैदराबादला चढले स्फुरण; भारताविरुद्ध सलग तीन अर्धशतकांसह मोठे विक्रम नावावर