भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये (ind vs wi t20 & odi series) तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका फेब्रुवारी महिन्यात खेळली जाणार आहे. बीसीसीआयने बुधवारी (२६ जानेवारी) या आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात भारताच्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर काही दिग्गजांनीही संघात पुनरागमन केले आहे. परंतु एक खेळाडू असा आहे, ज्याला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली होती, पण वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवडकर्त्यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवत त्याला संघातून बाहेर ठेवले.
फक्त दोन सामन्यांसाठी दाखवला होता विश्वास
अष्टपैलू वेंकटेश अय्यर (venkatesh iyer) याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडले गेले नाहीय. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमध्ये मात्र त्याला संधी दिली गेली होती, पण तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अय्यरला संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. तसेच फलंदाजीतही तो स्वस्तात बाद झाला होता.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
आयपीएलमधील प्रदर्शनामुळे वेस्टइंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत मिळाली संधी
वेंकटेश अय्यरने आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. केकेआरसाठी त्याने १० सामन्यांमध्ये ४१ च्या सरसरीने ३७० धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही त्याने महत्वपूर्ण प्रदर्शन केले होते. याच पार्श्वभूमीवर त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळाली आहे. सर्वांना अपेक्षा आहे की, वेंकटेश संघातील हार्दिक पांड्याची कमतरता भरून काढेल.
रोहित शर्माचे संघात पुनरागमन
भारताचा एकदिवसीय आणि टी-२० कर्णधार रोहित शर्माही वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेतून संघात पुनरागमन करणार आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी रोहितच्या पायाला दुखापत झाली होती आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत सहभाग घेऊ शकला नव्हता. आता रोहित पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि संघात सामील होणार आहे. त्याव्यतिरिक्त दीपक हुड्डा, रवी विश्नोई आणि कुलदीप यादव यांना वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी मालिकेत संधी मिळाली आहे.
आगामी मालिकेसाठी निवडलेला भारताचा एकदिवसीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
महत्वाच्या बातम्या –
सुपर लीगच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडची धडक, बघा भारत आणि पाकिस्तान कधी खेळणार क्वार्टर फायनल?
पुष्पा फिव्हर! ‘श्रीवल्ली हुक स्टेप’ करत शाकिबने केले विकेटचे सेलिब्रेशन, व्हिडिओ बघतच राहाल
पुष्पा फिव्हर! ‘श्रीवल्ली हुक स्टेप’ करत शाकिबने केले विकेटचे सेलिब्रेशन, व्हिडिओ बघतच राहाल
व्हिडिओ पाहा –