भारत आणि वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (India vs West Indies 2nd ODI) बुधवारी (९ फेब्रुवारी) रोहित शर्माच्या( rohit sharma) नेतृत्वाखाली अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्यांदा खेळताना २० षटकांमध्ये ९ गडी गमावत २३७ धावांचे आव्हान वेस्ट इंडीजसमोर ठेवले आहे.
या सामन्यात भारतीय संघाच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी केली. रिषभ पंत भारतीय संघात चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळतो. त्यामुळे त्याला सलामीवीर म्हणून पाहणे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते.
रिषभ पंतने पहिल्यांदाच भारतीय संघासाठी सलामी दिली आहे. तो १९ वर्षाखालील संघात सलामीला फलंदाजी करत होता. पंतने या सामन्यात ३४ चेंडूत फक्त १८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट फक्त ५२.९४ होता. पंतने त्याच्या छोटेखानी खेळीदरम्यान तीन चौकार मारले, पण तो एकही षटकार मारु शकला नाही. या सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. पंत मागच्या सामन्यातही ९ चेंडूत ११ धावा करुन बाद झाला होता. तसेच मागच्या सामन्यात ६० धावा करुन बाद झालेला रोहित शर्मा सुद्धा या सामन्यात अपयशी ठरला. त्याने ५ धावा केल्या आणि बाद झाला.
भारतीय संघाने ५० षटकात ९ बाद २३७ धावा केल्या आहेत. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६४ धावा केल्या. यादवने ८३ चेंडूंचा सामना करताना या खेळीत पाच चौकार लगावले. केएल राहुल ४९ धावांवर बाद झाला. दीपक हुडाने २९, वॉशिंग्टन सुंदरने २४ आणि विराट कोहलीने १८ धावा केल्या.
रिषभला सलामीला पाठवण्यामागचे कारण
२०२३ विश्वचषकापूर्वी भारतीय संघात आवश्यक बदल सुरूच राहतील, असं रोहित शर्माने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पंतला सलामीला पाठवणे हा याच प्रयोगांपैकी एक प्रयोग असल्याचे मानलं जात आहे.
शिखर धवन सहसा रोहित शर्मासोबत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून जबाबदारी सांभाळत असतो. पण कोरोना चाचणी पाॅझीटीव्ह आल्यामुळे पहिल्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. दुसऱ्या सामन्याच्या एक दिवस आधी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याने नेटवर सराव सुद्धा सुरु केला आहे. परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. आजच्या सामन्यात इशान किशनच्या जागी केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड सुद्धा या सामन्यात खेळला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय महिलांची हाराकिरी, न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव टी२०त १८ धावांनी पराभूत
अर्रर्र! ४९ वर रनआऊट होताच केएल राहुलचा सूर्यकुमारवर संताप, व्हिडिओ होतोय व्हायरल
वनडे क्रमवारी: टॉप-३ मध्ये विराटच्या जवळ पोहोचला रोहित, पण आझमची दशहत अजूनही कायम