वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत(IND vs WI T20) भारतीय संघाने दुसरा सामना ८ धावांनी जिंकत २-० अशी आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (bhuvneshwar kumar) शेवटी सर्वोत्तम गोलंदाजी करत सामना भारताकडे वळवला. त्याच्या कामगिरीमुळे आणि दुसऱ्या टी२० मधील विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आनंदी दिसत होता. रोहितने(captain rohit sharma) त्याची जोरदार प्रशंसा केली आहे आणि टीकाकरांना उत्तर दिले आहे. तसेच रोहित शर्माने विराट कोहलीचे देखील कौतुक केले आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा तुम्ही वेस्ट इंडीजच्या पावर हिटर्ससोबत खेळत असता, तेव्हा तुम्हाला नेहमीच थोडी भीती वाटत असते. शेवटी आम्ही दाखवलेला खेळ अप्रतिम होता. सुरुवातीपासून आम्हाला कल्पना होती की हे सोपे नाही. परंतु दबावाखाली आम्ही आमची योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवू शकलो याचा मला अभिमान आहे. भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी केली, ती षटके सामन्यातील खुप महत्त्वाची होती.”
लोकांकडून होणाऱ्या टीकेने संघातील खेळाडूंना काहीही फरक पडत नसल्याचे रोहितने स्पष्ट केले आहे. रोहित म्हणाला की, “हीच योग्य वेळ आहे, तुमच्या जवळ जो अनुभव आहे, तो कामी येतो. भुवी खुप वर्षांपासून हे काम चांगल्या पद्धतीने करत आहे आणि या गोष्टीसाठी आम्ही त्याच्यावर खूप विश्वास ठेवतो.”
वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने पराभवानंतरही रोवमन पाॅवेल आणि निकोलस पुरन यांच्या अर्धशतकी खेळीचे कौतुक केले. पोलार्ड म्हणाला, “ते आज(१८ फेब्रुवारी) खुप छान खेळले. त्याच्या पूरनसोबतच्या भागीदारीने सामना आमच्या हातातून जवळजवळ काढून घेतला. या खेळाडूंच्या कामगिरीवर मी खुश आहे. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. तुम्ही या फलंदाजांनाही श्रेय दिले पाहीजे.”
भारत दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडीज संघाचा हा सलग पाचवा पराभव आहे. या अगोदर अहमदाबाद येथे पार पडलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत देखील पाहुण्या संघाला अपयश आले होते. ती मालिका भारताने ३-० ने जिंकली होती. आता या दोन संघांमधील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना २० फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफीत आले अब्दुल समदचे वादळ! झंझावाती शतकासह मोडले अनेक विक्रम
मोठी बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी संघ जाहीर, बुमराहची उपकर्णधारपदी निवड
ब्रेकिंग! वनडे, टी२० नंतर कसोटीच्याही नेतृत्त्वाचा मुकूट रोहितच्याच डोक्यावर, संघाचीही झाली घोषणा